Monday, June 20, 2011

Ekeshwarwad aani law of Conservation of Energy

Energy can neither be created nor be destroyed. It can just be transformed from one form to another and the total amount of (mass and) energy in the universe always remains constant...

उर्जा तयारही करता येत नाही आणि संपवातही येत नाही. तिचे फक्त एका रूपातून दुसऱ्या रुपात रूपांतरण होऊ शकते. विश्वातील एकूण उर्जेचे प्रमाण हे कायम तेच राहते.

साधारणतः इयत्ता आठवीत शिकलेला, तेव्हा कळलेला (आठवीत Newton चा हाच एक नियम कळू शकतो असं माझं ठाम म्हणणं आहे) आणि आवडलेला (कारण पाठ करायला सगळ्यात सोपा) असा हा नियम...

हा नियम एकेश्वरवादाचा उद्घोषक आहे हा आताच मला झालेला साक्षात्कार.. साक्षातकरच म्हणावा लागेल कारण हे अध्यात्माशी वगैरे related आहे ना... पण ज्यांना नास्तिकतेचा अथवा विज्ञाननिष्ठतेचा tag मिरवायला आवडतो त्यांना हा नियम नाकारून चालणार नाही आणि त्यामुळे unknowingly का होईना पण ते एकेश्वरवादाचाच स्वीकार करत असतात...

एकेश्वरवाद सांगतोः 'की जग हे अद्वैत आहे'. अद्वैत म्हणजे एक आणि एकच. पाश्चिमात्यांनी आपला समज करून दिलाय की हिंदू धर्म हा 'polytheism' वर आधारीत आहे कारण आपण so called ३२ कोटी देव मानतो.  पण वास्तविक पाहात हिंदू धर्म सांगतो देवाला कुठल्याही रूपात माना, सरतेशेवटी, तो परमात्मा एकच आणि अविनाशी आहे. हाच 'अद्वैत'भाव (अद्वैत = न द्वैत = दुसरा नसलेला) एकेश्वरवादाचं मूळ सूत्र आहे.

हिंदू धर्मात आपल्याला कायम सांगितलं आहे कि ईश्वर हा निराकार, निर्गुण आहे. (त्याला रंग नाही, रूप नाही, गुण नाही, भाव नाही...) यालाच हिंदू धर्माने परमात्म्याची संज्ञा दिलेली आहे. (गणपती, शंकर, विष्णू हि त्यांची सदेह रूपं. केवळ आपल्याला परमात्म्याशी connect होता यावं म्हणून आहेत). तर आता मी परमात्मा हीच 'total amount of energy in the universe ' आहे असं का म्हणतो ते बघा :

१. परमात्मा अनादी आहे - energy can neither be created 
२. परमात्मा अनंत आहे - energy can nor be distroyed  
३. परमात्मा उंश रूपाने आपल्या सगळ्यां मध्ये व्यापून राहिला आहे - it can just be transformed from one form to another   
४. परमात्मा निराकार, निर्गुण आहे (तो (देव (खरतर मला हा शब्द मान्य नाही पण तरीही))) दिसत नाही, अनुभवावा लागतो ) - energy हि दिसू शकत नाही पण तिच्या प्रत्यवाय आपणास येतो आणि आपण energy आहे हे मान्य हि करतो (ते Newton नि लिहून ठेवलाय ना, जर हिंदू पुराणात लिहिलं असतं तर मग आपण ते अमान्य केलं असतं..)

आणि आपण अगदी बोली भाषेत म्हणत असतो कि काही काम करण्याची energy च नाही ह्याच energy ला आत्मा हि संज्ञा वापरली आहे.

५. हिंदू संस्कृतीची पुनर्जन्माची concept - transformation of energy from one form to another
६. आपण मान्य केलेला कर्माचा सिद्धांत सांगतो कि आपण जसे कर्म (काम) करतो तशीच गती आपल्याला अर्थात आपल्या आत्म्याला मिळते. म्हणजेच कर्म आणि आत्मा हे interrelated आहेत.. - त्याच प्रकारे energy (आत्मा) आणि work (कर्म) interelated आहेत. अगदी physics च्याच terminology मध्ये बोलायचे झले तर both work and energy are measured in 'joules '...
७. अजून थोड खोलात शिरलो तर कार्मिक सिद्धांत म्हणतो जर तुम्ही कुठलं हि चांगलं काम केलंत तर पुढचा जन्म चांगला मिळेल. - we know that Work = f (Force ) आणि Energy = f (work ). अर्थात आत्म्याला जसा force आपण लावू आत्म्याला तशी गती मिळेल. आणि जो पर्यंत हे Force neutralize होत नाहीत तोपर्यंत Energy चे रूपांतरण चालूच राहणार... म्हणजेच जन्मजन्मांच्या साखळीत आत्मा अडकतच राहणार... जेव्हा आपण कूठला हि Force लावणं बंद करू म्हणजेच जेव्हा आपल्या वासना, इच्छा संपतील (यालाच हिंदू धर्मात निष्कामकर्मयोग असं म्हणालं आहे). तेव्हा Energy चे रूपांतरण थांबेल... it will become part of total  amount  of Energy in the universe अर्थात आत्मा परमात्म्यात विलीन होईल... आपल्याला मुक्ती मिळेल...   
८. हिंदू धर्म फक्त सजीवांबद्दल बोलून थांबत नाही तर तो म्हणतो या चारचार (सजीव आणि निर्जीव) सृष्टीत वावरणाऱ्या मधील आत्मा हा एकाच आणि अविनाशी आहे. म्हणजेच दगड धोंडे, माती, पाणी, हवा, पृथ्वी, सूर्य, चंद्र, आकाशगंगा या सर्वान मधेच परमात्म्याचा वास आहे (नरसिंह ची गोष्ट आठवतीय..?? परमेश्वर सगळी कडे आहे). आता असं बघा, निपचित पडलेल्या दगडात कूठला परमात्मा..??? पण कुठली हि स्तब्ध गोष्टीत PE (potential Energy असतेच ना). वाहत्या पाण्यात KE (kinetic Energy असते). सूर्य, पृथ्वी, चंद्र इत्यादिन मध्ये gravitational Force असतो म्हणजे एका प्रकारची उर्जाच असते... (remember E =f(w ) = f(F)). आणि जेव्हा scientists म्हणतात सूर्य मारणार आहे तेव्हा त्याला हि आपल्या सारखेच जन्म मृत्यू चे नियम लागू होतात हेच नाही का सिद्ध होत...
९. हीच concept पुढे न्यायाची तर ज्योतिषशास्त्रालाहि आधार सापडतो... जर दूरवरच्या चंद्र, सूर्यामुळे पृथ्वी वर वादळ येत असतील, ऋतू असतील, भारती ओहोटी होत असतील तर मग हेच दूरस्थित ग्रहगोल आपल्या आयुष्यावर का परिणाम घडवून आणू शकणार नाहीत.. कारण at the core हे ग्रहगोल हि Energy च आणि आपण हि Energy च.. 


आता प्रश्न पडतो कि जर परमात्मा अशी कोणी व्यक्ती नाही, ती एक उर्जा आहे तर मग गणपती, ब्रह्मा, इंद्र हे कोण आहेत??? हि आहेत आपल्या अल्प मतीस निर्गुणाची कल्पना पचनी पडावी म्हणून पराम्यात्म्याला दिलेली मूर्त रूपं... आपल्याला जो आकार जवळचा वाटतो, त्याची भक्ती करावी.. अर्थात तिथे आपली सगळी उर्जा एकवातावी म तिला unbalanced forces मिळणार नाहीत आणि आपल्याला मुक्ती मिळेल.. मग आता आपल्याला शंका येईल कि जर आपण परमेश्वराचं अमूर्त रूप स्वीकारला तर मंदिरांची काय गरज? पण मंदिरा महत्वाची आहेत कारण तिथे वर्षानुवर्षे अगणित लोकांच्या positive energies (त्यांचा देवावर असलेल्या विश्वासाच्या रूपाने) समाविष्ठ असतात...


वेद उच्चार, जपजाप्य, होमहवन, मंदिरातील घंटा हे सर्व का? कारण हे सर्व वेगवेगळ्या energies च आहेत (sound Energy , light and fire energy)...


हां... दमलो... वरचे विचार खूप विस्कळीत आहेत.. त्यांना एक बांधेसूद रूप द्यायची इच्छा आहे... तुम्ही सगळ्यांनी दुवा करा (तुमची दुवांच्या रूपाने positive Energy मला द्या...)


इति परमेश्वरर्पनमस्तुI...