Wednesday, July 23, 2014

Jaati Nahi Wo...

जाती नही वो


या गोष्टीतील पात्र प्रसंगातील वास्तवाशी साधर्म्य हा निव्वळ योगायोग जरी नसला तरी, कुठल्याही जातीय अथवा सामाजीक भावना दुखावण्याचा या गोष्टीचा उद्देश नसून तसे अनवधानाने घडल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो. सत्य परीस्थीतीचा हा ही एक कंगोरा / आयाम इतकच.

माझी मैत्रीण प्राजक्ता दहीवाळ आणि मित्र राजरत्न कोरे यांना सस्नेह समर्पित.


_________________________________________________________________________________

॥प्रस्तावना॥

आरक्षणाचे वाढते वाद आणि त्याचे विश्लेषण करणारी कथा, महामानवांच्या जयंती मधला बिभस्तपना मोजक्या शब्दात दाखवणारी कथा, जात लपवणा-या मित्र- मैत्रिणीच्या भावना सांगणारी कथा, जात पाहून मगच प्रेमाबिमाच्या भानगडीत पडा अस सांगणा-या आपल्या घराच्या मंडळीना टोचणारी कथा, दोस्ती, यारी आणि दुनियादारी सांगणारी सूचक, भेदक आणि तितकीच हळवी कथा …आवडली

- राजरत्न कोरे

_________________________________________________________________________________


- आज (१५ जुलै २०१४) -


“Let’s break off” प्राजक्ता.
काय?” समीरन.
हं… you heard it right. Let’s break off” ती गंमत करतीय की seriously बोलतीय हेच क्षणभर समीरनला कळेना. पण एकुणातच तिचा आविर्भाव बघून ती गंमत करत नाही हे समीरन नक्की करतो. गेल्या ६७ वर्षांच्या त्यांच्या नात्यानी आणि त्यापुर्वीच्या पाचएक वर्षांच्या मैत्रीनी तो इतकं तर नक्कीच ओळखतो प्राजक्ताला. प्राजक्ताच्या ज्या devil may care attitude च्या तो प्रेमात आहे त्याचाच एक भाग म्हाणजे तीचं head strong nature. इतके दिवस त्याला याचा कधी त्रास झाला नव्हाता आणि तो असा १२ वर्षांनंतर लग्नाच्या पत्रीका वाटायला सुरवात झाल्यावर व्हावा?! ‘Let’s break off’ – that’s it!? No explanation, nothing…!
आज वर्षांनंतर अपूर्वची आठवण का व्हावी त्याला!
पायाखालची जमिन सरकते वैगरे म्हणतात ती कशी हे त्याला कळत होतं की त्याला घेरी येत होतीकुणासठाऊकपण प्राजक्ताच्या lavish living room मधे काहीसे odd वाटणारे बाबासाहेबांचे आणि भगवान गौतम बुद्धांचे life size photos हेलकावे घेताना त्यानी नक्की पाहीलं. कदाचीत हसले का ते त्याच्याकडे बघून???
हसलेच असतील. समस्तभोसलेखानदानाचा विरोध कमी करत करत त्यानी ह्या लग्नाला संमती मिळवली होती. त्याच्या आजीने मागे एकदा बोलूनही दाखवलं होतं की, “पदर लागणार नसेल, आपल्यातली कोणी येणार नसेल तर एक वेळ बामनाची पोर सून म्हणून मी खपवून घेइन पण महारची पोर काई मी घरात येऊ द्यायची नाई”. पण समीरनही अडूनच बसला. आणि सरते शेवटी आजी सकट घरच्यांनीही नांगी टाकली आणि एकदाची सुपारी फुटली. पण आता? आता घरी काय सांगणार होता तो? तोल जाऊन गपकन तो तिच्या पायाशीच बसला.
उठ समीर, माझा निर्णय झालाय”. आता मात्र समीरनचा धक्का विरून त्याची जागा राग घेत होता. त्याचा गहुवर्णी चेहराही लाल होत होता. ऊचपुर्या देहातून लढवय्या मराठा रक्त सळसळू लागलं होतं. विस्तिर्ण कपाळावरची शिर थडथडू लागली होती. पण प्राजक्ता शांत होती.
तुला गंमत वाटते का गं सगळी? हं? वर्ष प्राजक्ता वर्ष आपण हे नातं जगलोयआणि आज लग्नाची पत्रीका वाटायची वेळ येते तेव्हा तू मला सांगतेस की तू लग्न करू शकत नाहीस? मूळात हा निर्णय एकटी घेणारी तू कोण? अगं बोल काहीतरीकमीत कमी कारण सांगायची तरी decency दाखवली असतीस नापण छेम्हणतात ना, life is boom rang, वर्षांपूर्वी हेच झालंतूझा तोच हट्टीपणा, अपूर्व बाबतीत तेव्हाही तू हेच केलस आणि आता मलाही कुठलही कारण देता….”
कारण होतं समीरतेव्हाही आणि आत्ताहीमुळात तुला ते माहीत होतं, आहेतेव्हाही आणि आत्ताही…” प्राजक्ता तितक्याच शांतपणे बोलत होती. तिच्या त्या भितीदायक थंडपणानी समीरनही क्षणभर स्तब्ध झाला अणि मग कुठुनसं उसनं अवसान गोळा करून म्हणाला, “नाही माहीत मला... म्हणजे मी समजूच शकत नाहीलग्न करण्याचं तू जे देतियस ते कारण असूच शकत नाही…”
का? वर्षांपूर्वी तूझ्या जागी जेव्हा अपूर्व होता तेव्हा तुला ते कारण पटलं होतंमग आत्ता का नाही?”
“come on praj… तेव्हाचे preferences वेगळे होतेवयच तसं होतं आपलंभारावून जाण्याचंपण आत्ता…”
अपूर्व येतोय समीरन
.. काय? अपूर्व पुण्याते?”
हो
पण तो का? इतक्या वर्षांनीपरत…”
मी बोलावलय त्याला…”
“Disgusting…”
येइलच तो इतक्यात..”
समीरनची कपाळावरची नस पुन्हा थडथडू लागते. “एक मिनिट! हा आपल्या आयुष्याचा प्रश्ण आहे प्राजतो आपण सोडवला पाहीजेकोण्या तिराहीता समोर…”
प्रश्णच सोडवायचाय समीरनप्रश्णच सोडवायचाय…” दारावरची shrill bell त्यांचा संवाद तिथेच तोडते. लगबगीनं ऊठून प्राजक्ता दार उघडते आणि डोळ्याला retro lookचा stylish चष्मा, Top to bottom branded casuals मधला अपूर्व आत येतोत्याच्या पाठीवर एक sling bag लटकत असते. त्याच्या exquisite perfume च्या वासानी कोरेंच्या घरचं क्षणभरापूर्वीचं गढूळ वातावरणही थोडं निवल्या सारखं होतं. अपूर्वच्या त्या संपूर्ण अमेरिकाळलेल्या पेहेरावाला छेद देत होती ती त्याच्या कानातली टपोरी भिग्बाळी. मूळाच्या त्याच्या कोकणस्ती गोर्या रंगावर ते सगळं खूलूनही दिसत होतं, अपूर्व खरे सोबत आलेला हा लक्ष्मीचा राबता समीरन आणि प्राजक्तादोघांनाही नविन होता. त्यांचे -वासलेले डोळे तो compliment म्हणून घेतो आणि शांतता भंग करायची म्हणून “Hi” एवढच म्हणतो.
“Hi अपूर्वप्राजक्ता.
“Hi सम्या…” Hand shake करायला पुढे सरसावलेला स्वतःचा हात मागे घेत तो समीरला मिठी मारायचं ठरवतोअवघडलेल्या मिठीनी समिरन प्रतिसाद देतो. अवघडलेली की अपराधीअपूर्वला ठरवता येत नाही.
कसे आहात…” शांतता… “अं… actually मी फोन करणारच होतो…” समीरनचं आणि प्राजक्ताचं अवघडलेपण इतक्या वर्षांच्या gapमुळे नसावं अशी शंका अपूर्वला येऊन जाते. “पण बरं झालं तूच फोन केलास प्राज… I mean प्राजक्ता
मी निघतोसमीरन.
सम्याकाय झालय याला प्राजक्ता?”
अपू, कुठलीही अघळ पघळ बडबड करता सरळ विषयालाच हात घालतेलग्न करशील माझ्याशी?”
प्राजक्ता…” समीरनची कपाळावरची नस मागच्या १५-२० मिनटात तिसर्यांदा थडथडत असते
बोल अपू…” प्राजक्ता शांतच.
प्राजक्ता तो भारतात कायमचा परत आला नाहीये. काही दिवसातच तो परत अमेरीकेला पळून जाणारे…” खूप प्रयन्त करून अपूर्व harsh reaction द्यायची टाळतो. ”…प्रश्ण सूटतच नाहीयेकळतय का तूला
पांगूळगाड्यापेक्षा ते बरंअपूर्व लग्न करशील माझ्याशी?”
तू हे मुद्दामून करतियस ना? मला त्रास व्हावा म्हणून?”
कदाचीत…”
कदाचीत? हो का नाही?”
एक एक मिनीटमी निघतोमी तुम्हाला दोघांना भेटायला इथे आलो होतो. पण इथे काहीतरी वेगळच चाललय… Excuse me… See ya somether time.. may be…” अपूर्व.
“Yeah thanks” समीरन.
मला उत्तर दिल्याशीवाय जाणार?”
तू दिलं होतस?” आता मात्र आपला ताबा सूटतोय की काय असं अपूर्वला वाटू लागलं तरी तो पुढे बोलू लागला,आटोकाट प्रयत्न करून सगळं विसरायचा प्रयत्न करतोयगेली वर्षंपण अजूनही काल घडल्या सारखं सगळं स्पष्ट आठावतय मला…” त्याच्या डोळ्यात पाणी तरळतं… भूतकाळात प्राजक्ता आणि समीरनही वरही हावी होतो

- वर्षांपूर्वी (१५ मे २००६) –
- वेळः दुपारचे वाजून मिनिटे -


SNDT कॉलेजच्या groundवर पुण्यातले ६००७०० ‘open’च्या रक्ताचे तरूण तरणी जमलेले असतातउत्साहाने सळसळतकाहीतरी ऐतीहासीक वैगरे घडवण्याच्या तयारीतचिडलेले, धास्तावलेले, फुरफुरलेले, आसूसलेलेक्रांती घडवण्यासाठी, अन्याय रोखण्यासाठी. YFE अर्थात ‘Youth For Equality’च्या banner खाली भारतभरातून UPA Governmentनी उच्च शिक्षण संस्थांमधे propose केलेल्या २७% OBC reservationच्या विरोधात असेच मोर्चे निघाले होते, निघत होते. Reservationच्या आगीत होरपळलेले तरूण असेच पुण्यातील मोर्च्यात सामील व्हायला जमले होते.
आणि त्या गर्दीत ते तिघेही होते. विरश्री संचरलेले प्राजक्ता कोरे, समीरन भोसले आणि निरीच्छेनी आलेला अपूर्व खरे. त्यांच्या चांडाळ चौकडीतली विनया देशपांडे मात्र येणार नव्हती. हे सगळं नाटक कधी एकदा सुरू होऊन संपतय याची अपूर्व आतूरतेने वाट पाहात होता. आणि तितक्यात त्या अस्वस्थ गोंगाटाला छेदत YFEच्या पुणे wingच्या scoundrel leaderचा जबरदस्त पकड घेणारा आवाज निनादू लागला
धन्यवाद…” त्याच्या आवाजाचा खर्जच इतका भारावून टाकणारा होता की ६००७०० जणांचा जामाव क्षणार्धात शांत झाला. तो पुढे बोलू लागला “…धन्यवाद!!! खरंतरं धन्यवाद देण्याचं कारण नाही. कारण तुम्ही हे तुमच्या साठी करत आहात. तुमच्या न्यायासाठीस्वतःसाठी. Youth For Equality हे फक्त एक माध्यम आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं आणि आपल्या हक्कासाठी काही तरी करण्याचं.
Rallyला सुरूवात करण्या आधी काही महत्वाच्या सूचना
आपण इथून – SNDTपासून निघून canal roadनी JM roadला लागणार आहोत आणि बालगंधर्वपाशी आपली Rally संपेल.
अपेक्षेप्रमाणे देशभरातून निघणार्या YFEच्या अश्या ralliesना police आणि government कडून सबळ चिरडण्यात येतय
आजही पुणे policeची आपल्याला परवानगी नाही…” इतक्यात त्याच्या कानात कोणीतरी police मोठा फौजफाटा घेऊन आल्याचं सांगतात. “…police आलेत. In fact police force आलीय. ज्यांना कोणाला इथे येऊन चूक केली असं वाटत असेल, भीती वाटत असेल ते परत जाऊ शकतात. त्यांना कोणीही अडवणार नाही…”
चल प्राज…” घाइघाईत अपूर्व पुटपुटला. “…चल ना प्राजसम्या यार चला नाविकतचं दुखणं घ्यायला कोणी सांगितलय…”
अपू आपण इथून पळून जायला आलोय का? परत फिरणं हा प्रश्णच नाहीये. थांब गपचूप.” प्राजक्ता.
प्राज मी चाललोय…” आणि अपूर्व निघूनही जातो
अपू.. अपूर्व…” हतबल असहाय्यता आणि तितकाच पराकोटीचा राग अशा मिश्र भावनावेगात प्राजक्ता स्वतःचाच ओठ चावते. तिच्या डोळ्यात टचकन पाणि येतं.. अपूर्वनी असं तिला सोडून निघून जावंसमीरन तीच्या डोळ्यात आलेलं पाणी ignore करायचं ठरवून आपलं लक्ष YFEच्या leaderकडे द्यायचं ठरवतो.
YFE leaderचं पेटवून उठवणारं भाषण अजूनच तिखट होत असतं, “…तर आता षंढा सारखे बसून राहायचं नाहीआताच काहीतरी करूयातनाहीतर आपल्या भावी पिढीला दाखवायाला तोंड नसेल आपल्याला२००६ हे समानतेचं वर्षं म्हणून भारताच्या इतिहासात स्वर्णाक्षरात लिहीलं जाऊदेत. देश एक कायदा एक हा नारा जगभर दुमदुमु देतही आपली शेवटची संधी आहे…. तर बोला, देश एक…”
कायदा एक…” जमाव
देश एक…” आरक्त नेत्रांनी तो पुन्हा फुत्कारतो
कायदा एक..” त्याला मिळालेला प्रतीसादही तितकाच गगनभेदी असतो.
भारत जोडाआरक्षण तोडाएक नवीन आरोळी… “भारत जोडा…”
आरक्षण तोडाजमाव.
एऽऽऽ बंद कराही नौटंकी…” police loudspeakerवर बोलू लागले, “…सरकार करून बळाचा वापर करण्याची आम्हाला परवानगी आहे.. आम्हाला ते करायचं नाहीयेबंद …”
जात नाही… Marks बघा” leader अजून एक आरोळी ठोकतो
साल्यांनो कळत नाही का?...” police
जात नाही…” leader
“Marks बघा…” जमावही त्याला सामील होतो
हाणा रे यांनापोलीसी खाक्या दाखवल्याशिवाय यांच्या अकला ठिकाणावर नाही येणारगांडीवर रट्टे बसले की सगळी क्रांती बाहेर येइल ह्यांचीहाणा साल्यांना…”
सप्सप्सप्पोलीसांच्या काठ्या बसू लागल्या
आऽऽऽया सगळ्याची कधीच सावलीही पडलेली ती कोवळी पोरं विव्हळू लागली… “अरे आम्ही काय चोर आहोत का? का मारताय आम्हाआऽऽऽ आईगं…”
पोलीसांची मारझोड अधीक तीव्र होत गेली तसे विव्हळण्याचे स्वर अधीक, अधीक आर्त होऊ लागले. आरडा ओरड, लाठी मार, हल्ला, प्रती हल्ला, विव्हळणं, किंचाळणंएकुणात जे काही चालू होतं ते सुसंस्कृत मानव समाजाला शोभणारं नव्हतं. ही धुम्मश्चकरी युवा विरोध मोडून काढल्यावरच शमली… 
जनावरांना बोलता येत नाही म्हणून ते हिंसेच्या मार्गानी प्रश्ण सोडवतात. पण माणसातलं श्वापद इतक्या युगांच्या उत्क्रांती नंतर अजूनही जिवंत आहे हेच खरं.

- वर्षांपूर्वी (१५ मे २००६) –
- वेळः संध्याकाळचे .३० साधारणतः


इकडे, तिकडे मार बसलेले प्राजक्ता आणि समीरन सोफ्यावर बसलेले असतातरक्तानी माखलेले त्यांचे कपडे, इथे तिथे असलेल्या bandageच्या पट्ट्यासुजलेले कुल्लेघाबरलेले डोळेदोघे म्लान होऊन पडलेले असतात. विनया त्यांची सुश्रुषा करण्यात व्यग्र असते आणि अपूर्व पिंजर्यातल्या अस्वस्थ सिंहा प्रमाणे बाजूलाच येरझार्या घालत असतो. सगळेच शांतही शांतता भंग करायची कोणी?
समीरन तो प्रश्ण राग व्यक्त करून सोडवतो, “आईच्चा घो या पोलीसांच्याअरे गुन्हेगारांना मारावं तसं मारत होते. एक दोन लोक तर गचकतायतगचकूदेत पणतेव्हाच कुठेतरी क्रांती होईल.”
ओ क्रांतीवीरखाली या…” अपूर्वचा कोकणस्थी tone खिजवणारा असतो “…एक काठी नाही खाल्ली पोलीसांची तर अजून पर्यंत पाय लटपटतायत तुमचे आणि म्हणे क्रांती कर…” सुश्रुषा संपवून विनया पाणी घेऊन येते. “…हां पाजापाणी पाजा यांनाक्रांती करतायत म्हणे…”
“Come on अपूच्यायला in fact तू पाणी द्यायला हवं होतससम्याला नाही तर at least प्राजलाप्राज कसा गं तूझा असा हा boyfriend…” विनया.
“Stop it विनीप्राजक्ताला एवढं चिडलेलं क्वचीतच कोणी पाहीलं असेल.
प्राजु, एवढं चिडायला काय झालं बाळा…” अपूर्व काळजीनी प्राजक्ता जवळ येत म्हणतो.
लांबलांब…” ‘माझी प्राज मला हे बोललीयहे पचवायलाच अपूर्वला वेळ लागतो. “विनी याला सांग मला याच्याशी बोलायचं नाहीये…”
प्राजू, look, I am…”
अपू ती म्हणतीय ना नाई बोलायचं, मग सोड ना तिला एकटं…”
एक मिनीट सम्या…” अपूर्वचा आता चढेल सूर लागतो “…Praaj is my girlfriend and I know how to handle her. तीला या अवस्थेत मी एकटं सोडू शकत नाही…”
हो? मग जेव्हा rally मधे police आले तेव्हा ढुंगणाला पाय लावून पळून गेलास तेव्हा नव्हती सूचली ही अक्कल? Eunuch साला…”
सम्या भाडखाऊ…”
अपू एक मिनीटसम्या यार काय चाललय हेका एकमेकांवरच hyper होताय… chill जराप्राज तू तरी समजव ना यांना…” प्राजक्ता विनया कडे फक्त बघत राहाते… “…प्राज…”
प्राजक्ताची तशीच विनया कडे तंद्री लागलेली असते… “सम्या काय चूकीचं बोलतोय विनीअगं मला girlfriend म्हणवणारा हा माणूस मला तिथे एकटीला सोडून…”
प्राज please अगंसम्या fuck you man…”
अपू बासएकतर या दोघांना एवढं लागलय आणि त्यात तुही चिडचिड केलीस तर…”
अगं म ह्या यडझ…” अपूर्व शिवी तोंडातच गिळतो, “…च्यायला एऽऽऽ uselessये का रे तू? Police आले तेव्हा चला चला सांगत होतो नाविनी तूला सांगतो पाया पडायचं फक्त बाकी होतं यांच्या…”
आणि आम्ही येत नाही म्हणल्यावर मला एकटीला सोडून तू घाबरून rallyतून पळून गेलास?”
घाबरून नाई प्राजघाबरून नाईमी पळून आलो कारण मी नाही म्हणून तरी तू मागे फिरशील असं वाटलं मलाआणि मग पुढचं हे सगळं अपोआप टळलं असतं. अगं २ दिवसांवर परीक्षा आलीय आपली. B.E. last sem!!! Do both of you understand its importance?”
प्राज actually… च्यायला थोडक्यात निभावलं म्हणून बरंकाही कमी जास्त झालं असतं आणि admit करावं लागलं असतं तरत्यातून प्राज तुझे आई बाबा पण गावी गेलेत
“admit सोड विनी पोलीसांनी jail मधे टाकलं असतं तर?”
“I swear यार.. तर काय करणार होतो आपण?” विनया.
च्यायला Infosys मधे job लागलाय आपल्याला… Dream company for any engineer. Last semला जर first class नाई मिळाला तर कुत्रं भिक घालणार नाई आपल्याला तिथेअपूर्व.
“How does it affect you Apoo? तू तर तिथून पळून आलास नाप्राजक्ता बर्याच वेळानी बोलत होती.
“It affects me coz it affects you Praaj”
बास अपूबासअजून किती खोटं वागणारेस तू?”
खोटं? प्राज खरच मनापासून…” ते वाक्य अर्धवटच सोडून तो पुढे बोलतोआणि एक मिनीट, मी अजून काय खोटं वागलोय would you please care to explain?”
समीरन मधे बोलायचं ठरवतो, “अप्या काल जेव्हा आपण rallyला जायचं की नाही हे ठरवत होतो तेव्हा वीनीनी नाही येणार हे स्पष्ट सांगितलं होतंपण तूला यायचं नव्हतं तरी तू हो म्हणालास…”
मला यायचं होतं सम्या
का?”
कारण प्राजला तिथं जायचं हो..”
समीरन त्याला मधेच तोडत म्हणतो “This proves her point Apya. तू खोटं वागलास… reservation रद्द होतय की नाही याची तूला काहीच पडलेली नाहीयेतू तिथे होतास कारण प्राज तिथे…”
हो. हो मला नाई पडली आरक्षण रद्द होतय कींवा नाई. हे असले protest वैगरे करून झाट काही फरक पडणार नाहीये. आहे ते ही हातचं निसटू नये एवढीच minimum अपेक्षा आहे माझी. Infosysचा job हातचा जाता कमा नये एवढंच मला कळतय…” अपूर्वचं वाक्य पूर्ण होतय न होतय तोच कोरेंच्या घराची shrill bell वाजते.
आता कोण आलय कडमडायला” अपूर्वच्या reluctant attitudeची चिडचिड प्राजक्ता दारावरच्या अनाहूतावर करते.
राज असेलविनया.
च्यायला आता तो कशाला आलय मरायलाप्राजक्ता. पून्हा एकदा shrill bell वाजते
मी बोलावलं त्यालाविनया.
तू? विनी कोणी सांगितला हा अचरटपणा करायला तूला
अगं? तूझा काय राग आहे ना त्याच्यावर मला हेच मला कळत नाई. काका काकू नाहीत इथे, हा राज सोडला तर पुण्यात तुमचं कोणी नाई. तूझ्या घरच्या कोणाला तरी कळवायला…” कोणी दार उघडत नाहीये म्हणल्यावर राजरन्त जोर जोरात दार वाजवायला लागतो. “दीदी दार उघड.. दार उघड दीदी…” राजरत्नचा बाहेरून येणारा आवाजच असभ्यतेला इतका धरून असतो की प्राजक्ताचा त्याच्यावर का राग आहे हे कोणीही ओळखावं.
अत्यंत निरीच्छेने प्राजक्ता दार उघडायला उठते. “आले बाबा.. आले…” पोलीसांच्या मारहाणीचा थकवा अजूनही जाणवत असतो तिला.
दार उघडताच बंदूकीतून गोळी सुटावी तसा राजरत्न घरात घुसतो. “दीदीकाय झालं..??? काय झालं दिदीला?” त्याच्या आवाजाला एक गावठी जरब असते. पण प्राजक्तानीच दार उघडलं. ती त्याच्या समोरच उभी होती. अजूनही तिथेच उभी राहून ती दार लावतीय, तेव्हा तिला बघावं, तीलाच directly विचारावं हे काई त्याला सूचलं नसावं. ‘राडाकरण्याच्याच मनसूब्यानी तो आला असावा पण आल्या आल्या प्रथम तो बाबासाहेबांच्या आणि भगवान बुद्धाच्या तसबीरीं समोर कमरेत वाकून हात जोडून उभा राहतो. तो काईतरी पुटपुटत असतो, श्लोक वैगरे असवा, पण तो सोडल्यास कोणाला ऐकू मात्र काही येत नाही. श्लोक म्हणता म्हणता तो मधेच एखाद्या गवय्याने आपल्या गुरुचं नाव ऐकून जशी कानाची पाळी पकडावी तसा कानाला हात लावतो. चूक भूलीची माफी मिळावी म्हणून स्वतःला दोन चार थपडा मारून घेतल्यावर ते नमस्कार नाट्य संपतं. त्याच्या काळ्या रंगाला त्यानी घातलेला भडक जपानी रंगाचा कुठला cheapसा jersey प्रचंड contrasting दिसत असतो.
तरी तूला सांगत व्हतो दीदी, ह्या भटांच्या टोळक्यात राहू नको. आपल्या लोकामंदी रापन तू ऐकनार थोडीचशेरात राउन तू पन या बांमनावानीच वागायतीय त्यांच्यावानीच बोलते पन हे बामन साले कंदी आपले व्हनार नाईत ध्यानात ठिव.”
राज, एक मिनीट…” परीस्थीतीचा ताबा घेत समीरन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, “…तू प्राजला भेटायला आलायस ना…”
प्राजक्ताप्राजक्ता तुकाराम कोरे. असं नाव ठेवलय तीच्या बानंकळलय का भटा…”
“okay, प्राजक्ताखूष? आणि मी तूला या आधीही हजारवेळा सांगितलय की मी ब्राम्हण नाही, मराठा आहे. ९६ कुळी.”
तू बी तसलाच रेया पून्याच्या बांमनांनमंदी राउन तू पन तसलाच झालाय
“okay. पण तू आत्ता हे बोलायला आलायस की बहीणची चौकशी करायला आलयस?”
अरे तुमीच भटांनी फूस लावली तीला अन त्या रॅलीत का फॅलीत गेलीना दीदी बोंबलायलातूला सांगतोय मी दीदी या बांमनांना बघावनार नाई आपन मोटं झालेलं
ए बाबा तू जानाआणि तू का उडतोय उगाच?” इतक्यावेळाच्या मौनानंतर अपूर्व बोलतो. प्राजक्ता आणि विनया अजून शांतच असतात. विनया आपण ह्याला कशाला बोलावलं म्हणून आणि प्राजक्ता तो कधी जाणार म्हणून. “rally OBC कोट्याला विरोध करायाला होती. तूमच्या SC कोट्याला कोण काइ बोललय का?”
अरं आज OBC आरक्षण हटवा म्हनताय, उंद्याच्याला संपूर्न reservationच बंद करा म्हनाल
मग? करायला नको? अरे ६० वर्षं झाली ना आता स्वातंत्र्य मिळून आणि reservations लागून. अजूनही कमी करणं तर सोडाच पण reservations वाढवायचीत तुम्हाला? याचा आम्हाला काय त्रास होतोय हे कधीतरी बघा की
व्वा! लागला का भट चूरू चूरू बोलायला ऑ? बस ६० वर्सं नाइ झाली त तूमची गांड जळतीय, तूमचे दादे परदादे मागचे २३ हजार वर्सं आमची मारत होते त्याचा हिसाब कोन देनारे?”
मग काय आता आपण बदला बदला खेळत बसायचं?” खरं तर अपूर्वला यात पडायचच नव्हतं पण राजरत्नला प्रत्युत्तर दिल्याशीवाय त्याला राहवत नव्हतं, मगासच्या भांडणाचा राग राजरत्नवर काढत असावा तो कदाचीत. पण प्राजक्ता त्याला असं बोलताना पाहून थोडी मवाळली होती.
अरे आपन त फुल तयारोत भाउतुमच्या त्या पेशव्यानं जी हालत केली व्हती ना आमची -  काय त म्हने सकाळी ९ ते दुपारी ३ शेरात आमी फिराय्चं नाईकारन काय त आमच्या लांब सावल्यांनी या बामनांनचा इटाळ होईलगळ्यात एक खापर बांदून त्यात थूकाय्चं नाइ त आमची थूक जिमीनीला लागली की यांच्या जिमिनीचा इस्कोट होईल. अरे गुरा ढोरांचं जिनंही नसिबी नाई ठेवलं तुमी वरच्या लोकांनी
हे बघ राजसमीरन अपूर्वच्या मदतील आला, “…पूर्वी तुमच्या लोकांना जे सहन करावं लागलं ते चूकच होतं, आम्ही कोणीही त्याचं समर्थन करत नाहीयोत. ते पाशवी, दानवी होतं. हे करणार्या आमच्या पूर्वजांची आम्हाला लाज वाटते.”
हांऽऽ, आमचं म्हणणं फक्त इतकच आहे की समाजातल्या ५०% लोकांना नाकारून पारतंत्र्य, गरीबी असे राक्षस already आपण पोसून ठेवलेत. मग आता त्या ५०% लोकांसाठी उरलेल्या ५०% लोकांना नाकारून आपण कुठलं शहाणपण दाखवतोय?” समीरनच्या मदतीमुळे अपूर्वला जरा जोश आला.
आता शानपन आटवतय व्हय तुमाला, आमचा छळ करताना नव्हतं आटवत ह्ये शानपन ते…  अरे आमची लग्न रातीतच लागतायत म्हनून हिनवता तूमी लोग पन दिवसा ढवळ्या मंदीरात सोडा, आसपास पन भटकू देनार नाई तुम्ही वरची जातवाले, म आमाला तुमच्या आया निजवल्याउरच रातच्याला लपून छपून लग्नं लावावी लागाय्ची
राजरत्न भाषा आवरसारं जग राजरत्नला राज असच म्हणायची. पण आपलसं करणार्या त्या टोपण नावानी प्राजक्ता त्याला कधीच हाक नाही मारयची. अपूर्व, समीरन आणि विनयालाही हे खटकायचं. पण तिच्या family विषयी, महार असल्या विषयी, ती फरशी कधीच बोलायची नाई. In fact सुरवाती सुरवातीला तर तीनं ह्या तिघांचं घरी येणंही शक्य तितकं लांबवलं. Reservationsशी लढत लढत admissions मिळवलेल्या openवाल्या ह्या तिघांशी मैत्री होत असताना ती देशस्त ब्राम्हण असल्याचं तीनं सागितल्याचंही विनयाला पुसटसं आठवतं. आणि तिचं शुद्ध बोलणं आणि आरक्षण विरोधी तिची मतं पाहून कधी कोणाला शंकाही आली नाही. दिवस सरत गेले, admissionsच्या कटू आठवणी मागे पडत गेल्या आणि त्यांची मैत्री घट्ट होत गेली. या तिघांनी आपल्याला मैत्रीण म्हणून पूर्णतः accept केलय ह्याची जेव्हा तीला खात्री पटली तेव्हा ती त्यांना घरी घेऊन गेली. कोथरूड मधलं तिचं well furnished घर पाहून त्याना जितकं भार्री वाटलं होतं तितकच, किंबहूना त्यापेक्षा कित्येक पटीनी जास्त आश्चर्य तिच्या घरातले बाबासाहेबांचे आणि बुद्धाचे फोटो बघून वाटलं होतं. पण या विषयी कोणीच तीला काही विचारलं नाही आणि ती ही कधी त्याविषयावर बोलली नाही.
ए दिदी तुला असल या भटांचा कैवारपन मला नाई…” राजरत्न काई मागे हाटणार नव्हता, “…अगं आपल्या लोगांनी काय काय सहन केलय त्याची कल्पनापन नाइ करू शकत ह्ये मोटे जातवाले
अरे सहन तुम्ही तर नाइ केलं ना, ते तुमच्या आधीच्या पिढ्यांनी केलय, पण आज आम्ही सहन करतोय.” इतक्या वेळात विनयानी पहिल्यांदा शब्द काढला होता. “८८-९०% marks मिळूनही पुण्यातल्या बर्या collegeमधे, हव्या त्या branchला आम्हाला admission नाई मिळत आणि आमच्या डोळ्यां देखत ४०% मिळवणारा कोणीतरी मौची नाईतर कोरेप्राजक्ताकडे बघून क्षणभर थाबून ती म्हणते, “…I am sorry प्राजसीओईपीतलीपुण्यातल्या top most collegeमधली seat घेऊन जातो?”
प्राज नाईप्रा ज क्ताकीती वेळा सांगायचे गं भटे?”
ए नाई म्हणणार प्राजक्ताकाय करायचय ते कर जानाई सहन करणार हां तूमची ही दादागिरी!” विनयाचं ते रूप पाहून सगळेच थोडे shock झाले.
राजरत्नलाही तिचं aggression अनपेक्षीत होतं, पण मग सवरून तोही तितकच aggression आणून म्हणतो, “करावं लागनार हांकरावं ला ग ना र. सालं पिन्याच्या पान्या साटी असो, अन्नाच्या दान्यासाटी असो, सरीरापुरत्या कपड्या साटी असो.. आमी सेहेन केलयऔषदाच्या गोली साटी अन तूमच्या देवळातल्या देवाच्या कृपे साटी झूरनं आमी सेहेन केलयपन त्या दगडाला मेला कदी पाझर फुटेचनाअरे मानसं नाई हैवानं हात तूमी. हैवानं… आमचं मरनाचं दारीद्र्य, वारंवारचे अपमान, तूमचं नाकारनं झिडकारनं धूत्कारनं आमी सेहेन केलय…  तूमची गटारं साफ करताना आंगाला लागलेली दुर्गंधी, सडकी, कुजकी, मेलेली जनावरं ढोंताना वस्त्यात घुसलेली रोगराई, संडास साफ करून आलेली अवकळा, ह्ये सेहेन केलय आमी. मानूस असून मानूस म्हनून न वागता येनं काय असतं ना ते तुमाला नाय कळनारत्ये सेहेन केलय आमीअनी म्हनूनच तूमालाबी सेहेन करावं लागनारतूमी reservationsच्या विरोधात मोर्चे काढनार तर आमी reservations साटी मोर्चे काढनारअरे ह्यी त सुरुवातेतूमच्या येनार्या पिढ्यांचं जगनं हराम करून नाइ सोडलं त बगाअत्ता admission तरी मिळतीय तुमाला पुढे ती ही नाई मिळनार
तू challenge देतो आपल्याला? तूमच्या नाकावर ट्टीच्चून आमची मुलं admissions मिळवतात की नाही ते बघ. जन्मतःच आम्ही आमच्या मुलांना शिकवू की बाळा ९९पेक्षा कमी marks पडले तर तू नापास. तूम्ही लोक आम्हाला दाबा आम्ही बुद्धीनी उसळून वर येऊ
नाई रे अप्या हे बोलायला, ऐकायला जरी भारी वाटलं ना तरी practical नाहीये
हंखरय सम्या तूझंखोल विचारात असल्यासारखी विनया बोलते, “मी जे ठरवलं होतं ते माझ्या मनात अजून पक्कं होतय. हे मोर्चे बिर्चे काढून काहीही होणार नाहीये. Reservationच्या त्रासातून वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे Reservationमधे जाणं. Yes… Reservationच्या त्रासातून वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे Reservationमधे जाणं. SC, ST, NT नवरा मिळाल्याशीवाय बोहोल्यावरच चढणार नाही मी. Correct आहे. माझ्या पुरता मी हा problem सोडवलेला आहे.”
“I swear… असा काहीतरी radical changeच आणला पाहीजे. कारण या देशाचं काही होऊ नाई शकत. मी जातो USला. ही last sem उरकली की, infyला टाटा बाय बाय, GRE द्यायची, USमधे MS करायचं आणि तिथेच settleही व्हायचं. Doneआहे. काय बोलतो सम्या?”
अप्या हे पळून जाणं…”
समीरन त्याचं वाक्य पूर्ण करायच्या आत प्राजक्ता अपूर्वचे दंड दोन्ही हातांनी घट्ट धरून त्याला विचारते, “तू खरच USमधे MS करणारेस?”
हांऽऽ म्हणजे तसा आत्ताच विचार…”
पुन्हा खोटेपणातूझा हा विचार आधीच करून झाला होता, म्हणून तू rally मधे यायाला interested नव्हतास… correct ना?”
नाई प्राजमी खरचम्हणजेआत्ताच…”
नाई नाई नाईमला गेले काही दिवस तूझा काहीतरी वेगळा विचार चाललाय असं वाटतच होतं. आत्ता strike होतय…”
प्राज तो म्हणतोय ना तसं काही नाहीय म्हणून…” समीरन त्याच्या मदतीला येतो.
चल क्षणभर आपण मान्यही करू की तूला हे सगळं आत्ता सूचलंपण तू USला जातोयस हे नक्की…”
नक्की म्हणजे अगंविचारपण हरकत काये?”
कीती ठिकाणी पळणारेस अपू? आणि हा असा हा पळपूटा attitude घेउन कसा जगणारेस? हे मला आधीच कळायला हवं होतंबगल मारून तूझ्या पुरता प्रश्ण मिटवतोस तू पण मूळ समस्या तशीच राहते ना आणि तूला त्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं…”
प्राज problem काये तूझा.. तू असं गोल गोल का बोलतीयसस्पष्ट बोल ना
मी स्पष्टच बोलतीय रे पण तूला ते कळत नाहीये. मी माझ्या मूलांना ९९% marks मिळवायला सांगीन हे जेव्हा तू म्हणाला होतास तेव्हा मला माझ्या choice बद्दल केवढा अभिमान वाटला होता. पण क्षणभरही टिकून दिला नाहीस तू. तूतू नेहमी सारखा पळून जाणारमीच खूप अपेक्षा ठेवल्या होत्या तूझ्या कडून
प्राज, बास. तू आता काही ही बोलायला लागलियस.”
मी नाई तू काहीही बोलतोयसमला finally सांग, तू reservationsच्या against stand न घेता पळून जाणारेस?”
आता मात्र अपूर्वचा पारा चढतो, “enough प्राजक्ता. enough.” आपल्या बहीणीवर डाफरणाराबामनराजरत्नला बघवत नसतो पण यानी आपली बहीण बामना पासून दूर गेली तर बरं हा विचार करून तो या सगळ्याची मजा घेत असतो. “…पळून जाणारे पळून जाणारे मगास पासून खूप ऐकून घेतलं. पण आता नाई. अपमान सहन करून घ्यायला माझ्याही काही limits आहेत आणि त्या तू cross करतियस. Now you mark my words आता तर मी MS करतोच आणि लग्न झाल्यावर तूलाही तिथेच घेऊन जातो. अपूर्वची जिद्द काय असते ते दाखवतो…”
अपूर्वचं वाक्य पूर्ण होण्या आधीच प्राजक्ता कडाडते “I am not your slave Mr. Apoorva Khare. तूझं MS तूलाच लखलाभनीघ तू.”
प्राजक्ता…”
नीऽऽऽघऽऽऽप्राजक्ता जवळ जवळ किचाळतेच त्याच्यावर. आरक्त नेत्रानी अपूर्व प्राजक्ताकडे बघतो, आणि कोणाला काही कळायच्या आत तो त्याची sack उचलतो आणि ताड ताड पावलं टाकत निघूनही जातो. समीरन आणि विनयाला अपूर्वला थांबवायला किंवा तीला समजवायला वेळही मिळत नाही
इतक्यात राजरत्नच्या धांगडधिंगा वाजणारा mobile ring tone सगळ्या वातावरणालाच गाल बोट लावतोHelloहांबोल रं जीव्याहांकाय? झालं? हां? झालं पास? कंचं channel? झी न्यूज का? अरं आलोच म्यीअन् काय ओली झालीच पाहीजेराजरत्न फोन ठेवताच वेड्या सारखा नाचायला लागतो. 27% OBC Reservationचा ठराव संसदेत एकमतानी संमत झाल्याची बातमी देउन आला तसा बंदूकीतून गोळी सुटल्यासारखा निघूनही जातो.
राजरत्नच्या पाठीमागे दार लावून आलेल्या प्राजक्ताच्या चेहेर्यावर काही वेगळेच भाव असतात. ती हसत असते, पण तीच्या डोळ्यातून पाणी झरत असतं. तीला काही तरी बोलायचं असतं, तीचे ओठही हालत असतात पण आवाज काही बाहेर पडत नसतो. प्रचंड दमलेली, थकलेली ती दिसते. कुठल्याश्या transमधेच येऊन ती सोफ्यावर बसते आणि एक आर्त, जीवघेणी किंकाळी देते. एक, मग त्यानंतर अजून एक. होते नव्हते ते ही त्राण संपल्यावर ती भानावर येते. समीरन आणि विनया तीच्या जवळ बसलेले असतात. ती विनयाला मिठीमारून मनसोक्त रडून घेते आणि घडा घडा बोलायला लागते,
तुम्हाला कायमच प्रश्ण पडले असतील ना की मी तूम्हाला मी देशस्त ब्राम्हण असल्याचं का सांगितलं? का मी तूम्हाला माझ्या घरी घेऊन यायला तयार नसायचे, का मी माझ्या नातेवाईकांबद्दल कधीच नाही बोलायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जातीनं महार असूनही का मी reservation विरोधातल्या मोर्च्यात इतक्या हीरीरीनं सामील झाले या सगळ्याची उत्तरं आज due झालीयत.” अवंढा गिळून ती पुढे बोलू लागते,
कारण मला तूमच्या लोकांचा त्रास पाहावत नाइ, असं काही मी बोलले तर ते फारसं खरं ठरणार नाही.
खरं कारण आहे, मला लाज वाटते मला reservation आहे म्हणून. मला राग आहे, ‘reservation ना म ही माठच असणार अश्या नजरेचामला राग आहे आमच्या सबंध जातीला लूळं पांगळं करणार्या ह्या reservation systemचा. IIT, IIM सारख्या premium instituteमधे आम्हाला reservation किती? २२% आणि त्यांतून campus placement होणारे कीती? % - %. का? तूम्हाला मोठासा आजर जडलाय. कुठल्या डॉक्टरकडे तुम्ही निरधास्तपणे जाल डॉ. डेंगळे की डॉ. आपटे? का? कारण ह्या reservationच्या कुकुबड्या देऊन आमचं सबलीकरण नाही तर दुर्बलीकरण चाललय. ४०% पडले तरी कुठेही admission आणि fixed सरकारी नोकरीमग कोण कशाला घेतय मेहेनत? आमच्या familyत तर माझे बाबा सोडले तर कोणीही वाचता येण्यापुरतंही शिकले नाही. माझ्या चुलत्यांचीही याहून काही बरी परीस्थीती नाही. आभ्यास न करता गाव गुंड होण्यात यांना धन्यता. ह्यांना शिक्षणाची गोडी लावण्याची खरी गरज आहे. reservationचं लालूच लावण्याची नाही.
आणि हे reservation देणारे तरी कोण आहेत? गांधी, राव, सिन्हा, सिग यांच्या सारखे उच्चा जातीतलेच ना? ही तर ह्या लोकांची चाल आहे. आम्हाला मागासलेलच ठेवण्याची. ह्या असल्यां दुट्टप्पी लोकांपेक्षा पुराणकाळातले ब्राम्हण बरे. समोरासमोर वार करायचे.
पण आमच्या लोकांना हे कळेल तर नाआंबेडकर जयंतीला speakerच्या भिंती लावायच्या, आणि दारू पिउन हीडीस गाण्यांवर बिभत्स dance करायचा एवढीच ह्यांची बाबासाहेबांशी ओळख. ना यांनी कधी बाबासाहेबांविषयी काही वाचलं ना बुद्ध धर्माविषयी. मुळात बाबासाहेबांना आमच्यासाठी स्वतंत्र मतदार संघ हवा होता पण गांधींनी त्याचं आरक्षणात रूपांतर केलं. ५० वर्षांनी reservationचं audit घेउन ते कमी कमी करत न्यावं पण ते हे ही बाबासाहेबांनी संविधानात सांगितलं पण ते ही नाई झालं, लोकांना वाटतं vote bank जाईल ह्या भितीनं reservation जात नाही. पण खरं कारण आहे अजूनही दलीतांना दाबून ठेवायची हाउस फिटली नाहीये त्यांची. आणि आता तर आमच्या लोकांना ह्या reservationच्या कुबड्यांची इतकी सवय लागलीय की त्याच्या शिवाय आमचं जगणं, प्रगती होणं आमच्या लोकांना अशक्य वाटतय. आम्ही आमचा self confidence मिळवलाच नाही कधी.
पण आपल्या माननीय HRD minister यशवंत सिन्हांना तेच तर हवयआमच्या जातीतल्या लोकांनी कायम सवर्ण लोकांनी फेकलेल्या तुकड्यांवरच जगावंजाती नही वोजाती’. जात नाही तीजातहेच खरय!!!”

 - १५ मे २००६ ते १५ जुलै २०१४


त्यानंतरचं एक वर्षं उलथा पालथीचं होतं. प्राजक्ता आणि अपूर्वचे ego खूप वाढले. त्या दिवसा नंतर दोघांनीही एकमेकांना फोन केला नाही. अपूर्व GRE देउन USला गेला आणि बाकी तिघांनी Infy join केलं. मधल्या काळात प्राजक्ता आणि समीरनचे सूर कधी जुळले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. अपूर्वनी या सगळ्यांशी contact ठेवलेच नाही, हळू हळू विनयाशीही त्यांचा contact कमी होत गेला. पठ्ठीनं मात्र बोलल्याप्रमाणे, कोण्या well settled ‘सुजल मोझरशी लग्न केलंआणि तीच्या पुढच्या पिढीसाठी reservation पक्कं केलं.

- आज (१५ जुलै २०१४) -


भूत काळाला भूत म्हणतात ते योग्यच असावं. मागील वर्षं झरझर मनातून फिरल्यानी तिघांच्या आतून काही तरी ढवळून निघालं होतं.
ती शांती तोडत अपूर्व बोलतो, “मला हा अधीकार आहे का नाही माहीत नाही तरी विचारल्याशिवाय राहावत नाही म्हणून विचारतो. Any problem both of you?” दोघेही काही बोलत नाहीत. “सम्या?”
त्रासून समीरन म्हणतो, “मला नाई रे हीला विचार. राणे, पवार, चौहान साहेबांच्या कृपेमुळे महाराष्ट्रात मराठ्यांसाठी आरक्षण जाहीर झालय आणि…”
“Oh! I see…” समीरनला पुढे काही सांगायची गरजच नसते.
“Apya I am really sorry yaar” समीरन अपूर्वच्या गळ्यात पडतो. वर्षांच्या अंतरा नंतर दोन जिवलग मित्रं भेटता. एकमेकांच्या मिठीत पडल्यावर त्यांना जाणवलं की इतके वर्षं आपण ह्या निर्भेळ मैत्री पसून दूर होतो. प्रचंड उब होती त्या मिठीत.
खूप वेळानी मिठी सोडवत, डोळ्याच्या ओल्या कडा पूसत अपूर्व प्राजक्ताला म्हणतो, “प्राजखाकरतो, “खरच हे कारण आहे?”
हो
वेडी आहेस का प्राज?”
अपू तूमच्या साठी आरक्षण हा discussionचा फक्त एक मुद्दा असेल, पण माझ्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्ण आहे. हे का कळत नाहीये तुम्हाला…”
आणि माझ्याशी लग्न करून हा प्रश्ण कसा सुटणारे?”
at least माझी मूलं reservationच्या भिकेवर तरी जगणार नाहीत.”
म्हणजे हा प्रश्ण फक्त तूझ्या पूरता सुटला, but on a bigger scale problem still persists. आणि हाच निर्णय तू वर्षांपूर्वी घेउ शकली असतीस.” प्रजक्ता कडे याचं उत्तर नसतं.
प्राज हे प्रश्ण असे सहजा सहजी सुटणारे नाहीयेत गं आणि म्हणून त्यांची अशी तडका फडकी उत्तरं पण नसतात शोधायचीनाहीतर जी चूक तू ८ वर्षांपूर्वी केलीस, तीच चूक तू आज पुन्हा करशील. फरक फक्त इतकाच असेल की ह्या वेळेस दुसरा कोणी समीरन तूला मिळेलच असं नाही. You might not be lucky second time.”
“पण म्हणून तर मी तूला लग्न कर असं म्हणतीय ना”
“Then in that case luck is definitely not in your favour.” Sling bagमधून अपूर्व त्याच्या लग्नाची पत्रीका काढून तीला देतो. “२१ तारखेला, स्व्प्नपूर्ती hall.” समीरन आणि प्राजक्ताच्या चेहेर्‍यावरचे surprised looks पाहून तो पुढे सांगू लागतो, “नेहा गोखले. माझ्या बरोबरच MS करत होती.” थोड्या वेळानी अपूर्वच बोलतो, “Any ways, so Praaj don’t be fool and stop playing with your life and Samyaa’s too”
थोडं मवाळून प्राजक्ता शेवटी मान्य करते, “See I know, what I am doing is not logical or may not be ethical either, but reservation is what I can’t tolerate at any cost.”
“कोण म्हणातय you need to tolerate reservations? In fact reservation असलेला मणूस जेव्हा reservationला विरोध करतो तेव्हा त्याचा impact already thousand times वाढलेला असतो.”
“हं…” प्राजक्ता इतकंच बोलते.
“चलो, मी निघतो. अजून विनीकडेही जायचय. २१ला भेटूच. नक्की येताय तुम्ही दोघं”
“हं… बस क्या… नक्की येणार.” समीरन.
“प्राज?”
प्राजक्ता एक आश्वासक होकार देत, “नक्की. And all the best Apoo”
“Thanks girl. जाता जाता एक सूचवतो, reservation असलेल्यांनी reservation शिवाय admission घेणं, म्हणजे reservation नसलेल्यांची एक seat खाणं. So तूमच्या मूलाची reserved म्हणूनच admission घ्या.” 
जताना अपूर्वच्या चेहेर्‍यावर स्मीत तरळलेलं असतं. 

6 comments:

  1. Good one Sagar... Keep it up!!

    ReplyDelete
  2. @ Kaustubh Thakur Thanks bro....

    ReplyDelete
  3. chan ahe... paan ha mala one act play watoo ahe.... hyala story mhanu naye...

    ReplyDelete
    Replies
    1. thanks amya.... are natakach lihayacha hota khoop divasan pasun pan te kuthe na kuthe adat hota... so thought ki goshta swarupat lihayala suravat karu n he vyayala gela...

      Delete
  4. good one...yup... very well narrated... one act play

    ReplyDelete
    Replies
    1. thanks nande... ata tu suggest kelya pramane ajun ek aani m pustakach...

      Delete