Thursday, January 28, 2016

अथर्वशीर्षाचे पठण्यायोग्य मराठी रूपांतरण

अथर्वशीर्षाचे हे मराठी पठण्या (म्हणण्यायोग्य रूपांतरण.

 

भाषांतर असा शब्द मुद्दामून वापरलेला नाहीकारण ह्यात काही काळ सुसंगत बदल केलेले आहेत (जसे आपण आता फारसे पूजत नसलेले इंद्रसूर्यबृहस्तती इदेव रूपांतरणात वगळलेले आहेतव त्यांचे स्पष्टीकरण शेवटच्या रकान्यात दिले आहे.

 

माझ्यामते असा बदल हिंदू धर्म मान्य आहे आणि वेळो वेळी हिंदू धर्मात तो स्वीकारलाही गेला आहे. (वैदीक काळातले वरूणवायूइंद्रादी देव जाऊन पुराण काळात त्यांची जागा ब्रम्हा विष्णू महेश यांनी घेतलीमग पुढे जनमेजयाच्या(पांडवांचा पणतुकाळात आस्तिक ऋषींनी आर्य व नाग समूदायाचे देव एकत्र करून शंकराच्या गळ्यात नागशेषनागावर विष्णू असा संकर घडवलाआताच्या कलीयुगातही दत्तपांडूरंग (विठ्ठल), बालाजी असे देव आपण स्विकारले.) (म्हणूनच अलिकडचे एक संत (मला नाव आठवत नाहीहिंदू धर्माचा उल्लेख ‘democratic religion’ (लोकाधिष्ठित धर्म)असा करतात). इतके वर्ष हिंदू धर्म टिकून राहाण्याचे गमक 'बदल स्वीकारणेह्यात आहे असे मला वाटते.

 

असो.

 

तर मराठी रूपांतरण काही स्वर(अक्षरं)आळवून(खेचून) / मागील ओळीतील शब्द पुढील ओळीत जोडून थोड्या बहूत फरकाने मूळ संस्कृत अथर्वशीर्षाच्या चालीत म्हणता येऊ शकते.

 



संस्कृत

मराठी

स्पष्टीकरण

 

 

 

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ।

ॐ. कर्णांसी सुवार्ता

*

भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।

नेत्रांसी सदा सुदृष्य

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्‍ँसस्तनूभिः ।

नीरोगी असो जीवन

व्यशेम देवहितं यदायूः ।

प्रभो तुझ्यात लीन

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः ।

कृपा तुझी सदा असो आम्हावर

इंद्रसूर्य ह्या देवांचा उल्लेख टाळलेला आहे

स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।

स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः ।

संरक्षिलेले असो तु हे जिवन

गरूड आणि देवर्षि बृहस्पतींचा उल्लेख टाळलेला आहे

स्वस्ति नो वृहस्पतिर्दधातु ॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ ॥

ॐ शांतीः शांतीः शांतीः ॥ ॥

ॐ नमस्ते गणपतये

ॐ. हे गणपती तुजला नमन हे

त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ।

तुच केवळ ते परम तत्व

त्वमेव केवलं कर्ताऽसि ।

तुच केवळ हे विश्व रचैता

त्वमेव केवलं धर्ताऽसि ।

तुच केवळ त्याचा पालनकर्ता

त्वमेव केवलं हर्ताऽसि ।

तुच केवळ ते संहारणारा

त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ।

तुच सृष्टी व्यापणारं ब्रम्हतत्व

त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ॥१॥

आणि साक्षात अविनाशी ते आत्मतत्व॥१॥

ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥२॥

हेच आणि केवळ हेच सत्य आहे॥२॥

सत्य बोलणारा मी आहे असे भाषांतर टाळलेले आहे

अव त्वं माम् ।

मी ही तुझाच अंश आहे

अव ह्या धातुचा अर्थ रक्षण करणे असा घेतात.  (त्या अर्थानी ह्या श्लोकाचा अर्थः माझेगुरु (वक्ता)शिष्य (श्रोता) इ. इ. चे अर्थात ज्ञानार्जना संबंधातील सर्वांचे रक्षण कर असा घेतात)

अव वक्तारम् ।

बोलणारा तु

अव श्रोतारम् ।

ऐकणारा तु

पण अव ह्या धातुचा अर्थ 'जाणणे / समजून घेणेअसाही आहे. (त्या अर्थाने मीबोलणारा,ऐकणारा इ. इ. आणि तु एकच आहे हे मी जाणतो असा घेतला आहे)

अव दातारम् ।

देणारा तु

अव धातारम् ।

आणि घेणाराही तु

अवानूचानमव शिष्यम् ।

सर्व काही तुच तु तुच तु

शिष्याचा उल्लेख टाळलेला आहे

अव पश्चात्तात् ।

पश्चिमेस तु

अव = जाणणे

अव पुरस्तात्

पूर्वेस तु

(ह्या अर्थानी घेतलेले आहे)

अवोत्तरात्तात् ।

उत्तरेस तु

अव दक्षिणात्तात् ।

दक्षिणेस तु

अव चोर्ध्वात्तात् ।

अवकाशात तु

अवाधरात्तात् ।

पाताळातही तु

सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ॥३॥

यत्र तत्र सर्वत्र माझे रक्षण करण्या तुच तु तुच तु॥३॥

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः ।

वांड्गमयात तु चेतनेत तु

वांड्गमयचा अर्थ भाषा / वाचा असा आहे

त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः ।

आनंदमय तु ब्रम्हमय तु

त्वं सच्चिदानन्दाऽद्वितीयोऽसि ।

अद्वितीयसा सत्-चित्-आनंद तु

त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ।

साक्षात ब्रम्हतत्व ही तु

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥४॥

ज्ञानमयी विज्ञानमयी तुच तु तुच तु॥४॥

ज्ञान = विश्वाविषयीचं ज्ञान (रासायनिकजैविक,भौतिक इ. शास्त्र (general science), गणित इ. चे नियम)
 विज्ञान = विशेष ज्ञान = परमात्म्याविषयीचे ज्ञान (त्याचे स्वरूप
अस्तित्व इ)

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ।

सर्व विश्व तुझ्यात जन्मते

सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ।

सर्व विश्व तुझ्यात वसते

सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।

सर्व विश्व तुझ्यात लोप पावते

सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।

सर्व विश्व तुझ्यात भासते

त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ।

तु भूमीजलअग्नीवायूअवकाश

पंच महाभूतांत तु आहेस

त्वं चत्वारि वाक् पदानि ॥५॥

वाचारूपातही तुच तु तुच तु ॥५॥

वाचा चार रूपी असते असे म्हणणे टाळलेले आहे. परा (अंतर्मनीचा आवाज)पश्यंती (मनन),मध्यमा (अस्फूट उच्चारण)वैखरी (संपूर्ण उच्चारण) ही ती चार रूपे

त्वं गुणत्रयातीतः ।

तु गुणांपलीकडचा

सात्विक (ऋषीविज्ञान)राजसी (मानवज्ञान),तामसी (दानवअज्ञान) (३ हा शब्द टाळलेला आहे)

त्वं अवस्थात्रयातीतः ।

तु अवस्थांपलीकडचा

जागृतावस्थास्वप्नावस्थासुप्ता(निद्रा)वस्था (३ हा शब्द टाळलेला आहे)

त्वं देहत्रयातीतः ।

तु देहांपलीकडचा

स्थूल (हाड-मास)सूक्ष्म (प्राणअंतःकरण),कारण (वलय - aura of a body) (३ हा शब्द टाळलेला आहे)

त्वं कालत्रयातीतः ।

तु काळांपलीकडचा

=भूतवर्तमानभविष्य (३ हा शब्द टाळलेला आहे कारण 'त्यांपलीकडचा हे जास्त महत्वाचं आहे)

त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् ।

तु मूलाधार चक्रात नित्य वास करणारा

मूलाधार चक्र हे कुंडलीनीतील पहीले चक्र आहे

त्वं शक्तित्रयात्मकः ।

तु शक्तींपलीकडचा

इच्छा (जग उत्पत्तीची)ज्ञान (जग उत्पत्तीचे),क्रीया (जग उत्पत्तीची) (३ हा शब्द टाळलेला आहे)

त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् ।

योग्यांनी सदा ध्यान लावलेला तु

त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं

तु ब्रम्हातु विष्णू

रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं

तु रुद्रतु इंद्रतु अग्नी

इंद्राचा उल्लेख ओघवता  असल्याने तो तसाच ठेवलेला आहे

वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं

तु वायूतु सूर्यतु चंद्रमा

ब्रह्म भूर्भुवस्सुवरोम् ॥६॥

तु ब्रम्हनपृथ्वीअतंरीक्षस्वर्ग लोक तुच तु तुच तु ॥६॥

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादींस्तदनन्तरम् ।

ग् आधी म्हणोनी अ त्यानंतरी म्हणावा

ग् + अ = ग (कारण देवनागरीत व्यंजन (ग्) + स्वर (अ) मिळूनच पूर्ण अक्षर (ग) बनते

अनुस्वारः परतरः ।

नंतर अनुस्वार देवोनी

 +  = गं

अर्धेन्दुलसितम् ।

चंद्रकोरीने सजवावा

गं +  = गँ

तारेण ऋद्धम् ।

ओंकाराने वाढविल्यास

ॐ गँ ('तारशब्द ओंकार दर्शवतो)

एतत्तव मनुस्वरूपम्

 गँ च्या मंत्रात तुच तु तुच तु

 गँहा गणपतीचा बिजा(२)क्षरी मंत्र मानतात (संस्कृत अथर्वशीर्षात ॐ गँ चा स्पष्ट उल्लेख नाही)

गकारः पूर्वरूपम् ।

गकाराने सुरवात

=ग्

अकारो मध्यरूपम् ।

मधे अकार

अनुस्वारश्चान्त्यरूपम् ।

आणि शेवटी अनूस्वार

=

बिन्दुरुत्तररूपम् ।

वर चंद्रबिंदी

=

नादस्संधानम् ।

आणि जोडीला ओंकाराचा नाद

 गँ

सग्ं‌हिता संधिः

अशा ॐ गँ च्या रूपात तुच तु तुच तु

(संस्कृत अथर्वशीर्षात ॐ गँ चा स्पष्ट उल्लेख नाही)

सैषा गणेशविद्या ।

हे असे गणेशाचे स्वरूप

विद्या हा शब्द वापरणे टाळलेले आहे

गणक ऋषिः ।

जे गणक ऋषींना आकळले

निचृद्गायत्रीच्छन्दः ।

ते मुक्तछंदात भाषांतरीले

मूळ संस्कृत अथर्वशीर्ष गायत्री छंदात आहे

गणपतिर्देवता ।

आणि गणपतीस अर्पिले

ॐ गं गणपतये नमः ॥७॥

अशा ॐ गँ च्या रूपातील गणपतीस मी नमिले ॥७॥

 गँ गणपतये नमःचा हाच अर्थ होतो

एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि ।

एकदंतास असे जे जाणतातवक्रतुंडास चिंतीतात

वरील श्लोकांतुन आम्ही जे गणपतीस जाणतो

तन्नो दन्तिः प्रचोदयात् ॥८॥

तो दंती आमुचा उद्धार करो ॥८॥

एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणम् ।

एक दात. चार हात. पाश-अंकुश धरिलेले.

सगुण रूपाचे वर्णन सुरु

रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ॥

ह्स्तीदंत. वरदमुद्रेतले हात.  उंदीर वहनास.

'उंदीरचिन्हांकीत ध्वजअसे खरे भाषांतर आहे

रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।

लाल लांब उदर. सूपासम कान ते. अन् लाललाल वस्त्र.

रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैस्सुपूजितम् ॥

रक्तचंदनाने लिंपीलेलं. लाल फूलांनी पूजिलेलं.

सगुण रूपाचे वर्णन समाप्त

भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।

भक्तांचा कैवारी. देव जग उद्धरीण्यासाठी

आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम् ।

सृष्टी प्रकृतीच्या आधी परमात्म्यातुन अवतरीत.

एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥९॥

याच रूपात सर्व योगी त्याचे नित्य ध्यान करीतात ॥९॥

वरील ओळीत गणेशाचे सगुण स्वरूप सांगितलेले असले तरी योगी निर्गुण रूपाचेच ध्यान करतात

नमो व्रातपतये ।

नमन जगतपतीस

व्रात = देवसर्व जगाचा समुच्चय

नमो गणपतये ।

नमन गणपतीस

नमः प्रमथपतये ।

नमन प्रमथपतीस

प्रमथ = शंकराच्या गणांचा एक प्रकार

नमस्तेऽस्तु लम्बोदरायैकदन्ताय

नमन लंबोदरासएकदंतास

विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः ॥१०॥

विघ्नहर्त्यासशिवसुतास वरदमुर्तिस नमन हे ॥१०॥

फलश्रुति

फलिका

एतदथर्वशीर्षं योऽधीते स ब्रह्मभूयाय कल्पते ।

अथर्वशीर्ष अध्ययनाने ब्रम्ह समजे

जो अभ्यास करेल त्याच्या बाबतीत ये सवे होईल असे मुळात लिहिलेले आहे. इथे 'तोहा शब्द टाळलेला आहे

स सर्वविघ्नैर्न बाध्यते ।

विघ्नांपासून सुटका होई

स सर्वत्र सुखमेधते ।

सुख वाढे

स पञ्चमहापापात्प्रमुच्यते ।

पापमुक्तता येई

 मोठी पापंकोणती त्या विषयी माहीती सापडली नाही

सायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति ।

संध्याकालच्या अध्ययनाने दिवसाघडले पाप फिटे

प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ।

प्रातःकालच्या अध्ययनाने रात्रीघडले पाप फिटे

सायं प्रातः प्रयुञ्जानो पापोऽपापो भवति ।

सकाळसंध्याकाळ पठण्य़ाने पापी पापमुक्त होई

अध्ययनास पठण हा शब्द वापरला आहे

सर्वत्राधीयानोऽपविघ्नो भवति ।

सततच्या पठणाने निर्विघ्न होई

धर्मार्थकाममोक्षं च विन्दति

धर्मअर्थकाम अन् मोक्ष मिळे

इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् ।

परी अयोग्य व्यक्तीस हे पठण्या कधी न देणे

अथर्वशीर्ष हा शब्द टाळलेला आहे. अयोग्य = जो जाणून बुजून गुन्हे करतो

यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति ।

तसे मोहात येऊन देणारा पापी होई

सहस्रावर्तनाद्यं यं काममधीते तं तमनेन साधयेत् ॥११॥

मनःपुर्वक सह्स्त्र आवर्तनाने ईप्सित साध्य होई ॥११॥

अनेन गणपतिमभिषिञ्चति स वाग्मी भवति ।

ह्या अथर्वशीर्षासह अभिषेकाने वाचासिद्धी येई

अथर्वशीर्ष हा शब्द मुळात नाहीगणपती हा शब्द घेतलेला नाही

चतुर्थ्यामनश्नन् जपति स विद्यावान् भवति ।

चतुर्थीस उपासासह जपल्याने ज्ञानसंपन्नता मिळे

इत्यथर्वणवाक्यम् ।

असे अथर्वण ऋषी म्हणती

ब्रह्माद्यावरणं विद्यान्न बिभेति कदाचनेति ॥१२॥

ब्रम्हावरणाचे ज्ञान होत सदा निर्भयता येई ॥१२॥

यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वैश्रवणोपमो भवति ।

दुर्वांकुराने पुजणारा धनवान होई

यो लाजैर्यजति स यशोवान् भवति ।

अक्षतांनी पुजणारा यशवान होई

स मेधावान् भवति ।

बुद्धीमान होई

यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति ।

हजार मोदकांनी पुजणा-यास इच्छित फळ मिळे

यस्साज्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते ॥१३॥

तुपसमिधांनी पुजता सर्व काही मिळे,सर्व काही मिळे ॥१३॥

अष्टौ ब्राह्मणान् सम्यग् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति ।

सदाचारी लोकांसह पठण्याने सूर्य तेज मिळे

आठ ब्राम्हणहा शब्द टाळलेला आहे

सूर्यग्रहेमहानद्यां प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति

सखोल अध्ययनाने मंत्र सिद्धी मिळे

सूर्यग्रहणात, (महा)नदी काठि अथवा गणेश प्रतिमे समोरहे लिहिणे टाळलेले आहे

महाविघ्नात् प्रमुच्यते ।

मोठ्या संकटातुनी सूटका होई

महादोषात् प्रमुच्यते ।

मोठ्या दोषांतुनी सूटका होई

महापापात् प्रमुच्यते ।

मोठ्या पापातुनी सूटका होई

स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति ।

ब्रम्ह ज्ञान मिळे ब्रम्ह ज्ञान मिळे

सर्व ज्ञान = ब्रम्ह ज्ञान

य एवं वेद ।

हे अथर्वशीर्ष वेद होत

इत्युपनिषत् ॥१४॥

अन् हेच उपनिषद ॥१४॥

ॐ सहनाववतु|

 आमुचे रक्षण होवो

सहनौभूनक्तू।

आमुचे पोषण होवो

सहविर्यं करवावहै।

आपल्याकडून सुकर्म घडो

तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै॥

 हे अध्ययन आम्हास तेजस्विता देवो

द्वेषरहीत असेहा उल्लेख टाळलेला आहे

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ।

ॐ. कर्णांसी सुवार्ता

भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।

नेत्रांसी सदा सुदृष्य

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्‍ँसस्तनूभिः ।

नीरोगी असो जीवन

व्यशेम देवहितं यदायूः ।

प्रभो तुझ्यात लीन

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः ।

कृपा तुझी सदा असो आम्हावर

इंद्रसूर्य ह्या देवांचा उल्लेख टाळलेला आहे

स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।

स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः ।

संरक्षिलेले असो तु हे जिवन

गरूड आणि देवर्षि बृहस्पतींचा उल्लेख टाळलेला आहे

स्वस्ति नो वृहस्पतिर्दधातु ॥

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ 

ॐ शांतीः शांतीः शांतीः ॥ ॥

 

फलश्रुतीचे भाषांतर व स्पष्टीकरण पाहील्यास आपल्या लक्षात येईल की हा मूळ अथर्वशीर्षाचा भाग नसून इतर श्लोक /पुराणां प्रमाणे नंतर भेसळ केलेला भाग असावा.

ॐ हा सृष्टी उत्पत्तीचा पहीला हूंकारसृष्टी निर्मितीची क्रमवारी अशी सांगतातः

 

प्रथम परमतत्व आणि केवळ परमतत्वच होतेत्यातुन सृष्टी का निर्माण झाली ह्याचे समाधान कारक उत्तर मिळत नाही.केवळ त्याला वाटले एकोऽहम्बहुस्याम भवेन’. (मी एकटाच आहेबहुविध होवोअसे वाटल्याने परमतत्वापासून मायेच्या आधारे अप्रकट असे शिवतत्वत्यातुन प्रकट सगूण असे ओंकारतत्व (अर्थात गणपती (‘ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था’ हे गाणं ह्यावरच आधारीत आहेप्रथम निर्माण झाले (म्हणून गणपतीस आद्यपूजेचा मानव ह्या ओंकाराच्या हूंकारातुन पंचमहाभूत व त्यातुन विश्व निर्मिती.
सृष्टी निर्माणाचे अजून एक कारण इथे पाहता येईल.

 

संदर्भः निरूपण 

संदर्भ २ः इंग्रजी भाषांतर 

 

 

No comments:

Post a Comment