Monday, March 26, 2012

Kahi goshti haravu nayet mhanun - 2

साधु आणि दरी

एक साधु हिमालयाच्या डोंगर दर्यातून भटकत असतो... दररोज भगवंताची आराधना करावी, ध्यान धारणा करावी आणि सृष्टीतील ईश्वरास धुंडाळत भटकत राहावं असा त्याचा रोजचा दिनक्रम...


एके दिवशी असाच फिरत फिरत तो एका उंच, दुर्गम अश्या कड्यावर चढून गेला.. रस्ता मोठाच कठीण.. खडतर, खाच खळगे असलेला.... वर चढे पर्यंत त्याची पूर्ण दमछाक झाली... हिमालयाच्या भर थंडीत त्याला कष्टानी दरदरून घाम फुटला, पाय बोलत होते... थकवा आला होता... पण समोर बघतो तो काय... खाली दिसणाऱ्या दरीच मनोहारी विहंगम दृश्य.. बघता क्षणी त्याचा थकवा पार कुठल्या कुठे उडून गेला... ते असीम सृष्टी सोंदर्य पाहून जणू त्याची समाधीच लागली... भूतलावर स्वर्ग अवतरला होता तिथे.. त्याला ईश्वराचा साक्षात्कारच जणू झाला..


तो साधु त्या मनोवेधक दृश्याच्या इतक्या प्रेमात पडला कि त्याला त्याचे जीवन तिथेच संपवसे वाटले... याहून अनोखे ह्या जगात काहीच असू शकत नाही ह्याची त्याला खत्री पटली आणि बघता बघता त्याने त्या दरीत उडी घेऊन आत्माहुती दिली...

वर्षान मागून वर्ष उलटून गेली.. युगान मागून युगे... ते लोभस दृश्य पाहण्याचे परम भाग्य कोणाच्याच नशिबी नव्हतं... पण एके दिवशी अचानक असाच एक मस्त कलंदर योगी पुन्हा त्याच जागी पोचतो...

त्यालाहि त्या पहिल्या साधु प्रमाणेच तेथील ईश्वरी अस्तित्वाची प्रचीती येते... तो हि पुरता मोहरून जातो आणि त्याची हि खात्री पटते कि ह्या हून स्वर्गीय असे काहीच नाही... त्याच्या हि मनात विचार येतो कि बस इथेच आपले आयुष्य संपून जावे... पण क्षणभरच...

त्याला जाणवते कि जर आपण आपले आयुष्य इथेच संपवले तर अजून कोणी इथे येई पर्यंत हे अतीव सुंदर दृश्य कोणीच बघू शकणार नाही.. अजून कोणालाच ह्या ईश्वरी कृपेचा प्रत्यवाय येणार नाही.. जर आज आपण हे दृश्य इतरान ना दाखवले नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे...

आणि तो त्याचं उर्वरित आयुष्य लोकांना त्या कड्यावर घेऊन जाऊन ते विभोर दृश्य दाखवण्यात घालवतो...
त्या कृपाशील योग्या मुले आज कित्येक लोकांना तिथे ईश्वरी साक्षातकार झाल्याचं लोक सांगतात...