Tuesday, May 29, 2012

Kahi goshti visarunayet mhanun - 3

दु:खाची पोती 

फार पूर्वीची गोष्टं आहे... जगातली सगळी माणसं आपापल्या दु:खानी अगदी वैतागून गेली होती... सगळ्यांना वाटायचं की देव आपल्याशीच असं का वागला? म्हणजे मला एवढं मोठ दु:खं आणि बाकी सगळ्यांची इवलीशी दु:खं ... मीच असं काय  पाप  केलाय  मग  माझ्याच  वाट्याला का ही दु:खं ...

आणि गंमत  म्हणजे सगळ्यांनाच असं वाटत होतं... मग काय... एके दिवशी सगळे लोक एकत्र आले आणि आपापल्या दु:खाचं पोतं उचलून  सरळ  देवा कडे आले... 

एवढ्या सगळ्या लोकांना एकदम  आलेलं पाहून देव बाप्पा ही जरा गांगरून  गेले... जरा गोंगाट शांत  झाल्यावर  त्यांच्यातल्या एका म्होरक्याने आपलं गाऱ्हाणं देवाला सांगितलं... देवानी एक  क्षण  भर  विचार केला मग  सगळ्यांना म्हणाला कि एक काम  करा, आपापली दु:खाची पोती तो तिथे कोपरा दिसतोय  ना तिथे नेऊन ठेवा.. देवाच्या सांगण्या प्रमाणे सगळे आपापली पोती नेऊन  ठेवतात... 

मग  देव म्हणतो,"आता असं बघा, मी हि भूलोकीची पोती माझ्याकडे कडे काही ठेऊ  नाही शकत... मला हि काही नियम पाळावे लागतात  बाबानो... पण  तुम्हाला एक मदत करू शकतो... नियमांना थोडी बगल मारतो आणि तुम्हाला अशी परवानगी देतो कि तुम्हाला जे पोतं  हलकं वाटतंय ते तुम्ही घ्या आणि सुखानी परत जा ... म्हणजे अश्यानी माझ्याकडची सगळी पोती ही संपतील  आणि तुम्हाला कमी दु:खाची हलकी पोती ही मिळतील... काय ? पटतोय  का उपाय...?"

देवाच्या ह्या उपायावर सगळे बेदम खुश झाले... त्यांना आत्ता पासूनच हायसं वाटायला लागलं... सगळे हो म्हणतायत  न  म्हणतायत  तोच  "तथास्तु" म्हणून  देव  आंतर्धान  पावला...

मग  काय... देवानी  सुचवल्या प्रमाणे सगळेजण  आपल्याला हलकं वाटेल  ते पोतं उचलून  चालू  लागले... पण  ते थोडं फार अंतर गेले असतील  नसतील  तोच त्यांना आपल्या पाठीवरचं  मगाशी हलकं वाटणारं पोतं कमालीचं  जड वाटू लागलं... अजून  थोडं अंतर गेल्यावर त्यांना हे पक्क कळून  चुकलं  कि आपलाच  पोतं इतरांपेक्षा हलकं  होतं.... 

पण  आता सौदा झाला होता... देव अंतर्धान  पावला होता....

courtesy: वादळवाट