एका वाक्यात या पिक्चरचं
वर्णन करायचं झालं तर Gulaab Gang is a movie with the weakest characterization of protagonist .
बिचार्या माधुरीला
सबंध पिक्चरभर, भेदक डोळ्यांनी बघण्याशिवाय काही कामच नाहीये. तिच्या characterला काही
आकार, उकार नाहीतच graph नाहीच. २ – ३ action sequences सोडले तर उरलेली दबंगगिरीही
तिच्या assistants (टोळीतील इतर बायका) करतात. जीव घेणे, मन मोडणारे, कस लागणारे असे
सर्वच्या सर्व प्रसंग तीच्या assistants वर येतात. हमे मिलती हैं एक बनी बनायी डिश!!
म्हणजे रज्जो (माधुरी) चित्रपटाच्या सुरवाती पासून ‘अशी’ असते. Period. पुर्णतः
established!! ती अशी का असते, का होते, तीचा संघर्ष, तीचं दुःख असं काहीच चित्रपटात
नसल्यामुळे, आपण रज्जोशी emotionally connectच होऊ शकत नाही. म्हणजे, एखाद्या
cookery show मधे ingredients दाखवायचे (अनिल कपूरच्या सुरवातीच्या दोन एक मिनटांच्या
रज्जोच्या बालपणा विषयीच्या निवेदनातून) आणि मग direct बनवलेली dish दाखवायची आणि उरलेला
सगळा वेळ, garnishing करत बसायचं… अरे hello!!! पण dish कशी बनवली ते दाखवाना…
Where as जुही is awesome
in the movie! With her cunning smile, her cold blooded glances, devil may care behavior,
revengeful attitude and proudy self portrayal, she establishes herself as an
epitome of villainism. Her character establishes in front of us - audience. Her
references to her past (her husband, his portrait, her portrait with him), her
relations (बहीण, व्याही etc) give an instant connect to her character. आणि bubbly
जुहीला, याआधी कधीही न पाहीलेल्या रूपात पहाणं is an experience in itself. पण माधुरी
बद्दल असं ही काही होत नाही. कारण तिला अश्या strong characters मधे आपण याही आधी मृत्युदंड
म्हणा किंवा लज्जातून म्हणा पाहीलय.
एकुणात पिक्चर विषयीही
बोलायचं झालं तरी तिथेही निराशा होते. गुलाब गॅंगच्या पोरी लाठ्या काठ्यांची practice
करताना कमी आणि नाच गाणि करतानाच जास्त दिसतात. तसच स्त्रीया domestic violence करणार्यांचा
violently प्रतीकार करू शाकतात हे समजण्याजोगं आहे. पण राजकारण्यांनी पाळलेल्या हट्ट्या
कट्ट्या, धिप्पाड गुंडांनाही लिलया हरवताना बघून त्यावर कसा विश्वास ठेवायचा? बर, गुलाब
गॅंगच्या सगळ्या बायका कायम गुलाबी साडीच हातमागावर विणतात आणि gift करतात. का? जागात
इतर रंगांच्या साड्या नेसणं बायकांनी बंद केलय का? त्यातून ही सगळी गोष्ट घडते
north Indiaतल्या एका खेड्यात आणि चित्रपटात पूर्णवेळ दिसतं ते महाराष्ट्रातलं खेडं
(shooting वाईचं आहे)! डोंगरदर्या, कौलारू घरं / शाळा हे खूप महाराष्ट्र specific
आहे. Art Director नी ही चूक का करावी? रज्जोच्या बालपणाच्या दाखवलेल्या गावात तर लोक,
त्यांचे costumes हे छाप मराठी. गाणी म्हणावीत तर तीही लक्षात राहाण्याजोगी नाहीत.
बाकी background
score उत्तम जमलाय. पटत नसले तरी action sequences छान. माधुरीनी त्यात कमाल केली आहे.
ती दोन चार ठिकाणी मार डाला तर एखाद ठिकाणी म्हातारी दिसलीय. पण दुर्दैवानी, देवदास
नंतर माधुरीचे आलेले तिन्ही pictures माधुरीमय असूनही माधूरी fans उपाशीच राहीलेत!
Actually संपत पाल
(on whose life this movie is supposedly based) यांनी हा पिक्चर आधी पाहीला असता तर
त्यांनी नक्कीच stay आणण्याचा विचार केला नसता कारण यात filmच्या heroinला, रज्जोला
काही अर्थच नाहीये.
असो एकुणात, काय तर
माधुरी साठी या, आणि जुहीला बघून जा…!!!