Thursday, May 26, 2011

Ek Apratim Kalakruti hota hota rahilela chitrapat - Balgandharva

तसे  बरेच  दिवस  झहाले  हा चित्रपट पाहून... बरेच दिवस लिहायचं लिहायचं म्हणत होतो पण राहून गेलं...

तर अगदी खरा सांगायचं तर मला हा चित्रपट बघावाच असं काही वाटत नव्हतं... आणि त्यातून आमच्या भावी अर्धांगाने खूप काही  सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नव्हती... so थोडक्यात खूप काही अपेक्षा ठेवून गेलो नव्हतो..

पण सुरवाती पासूनच चित्रपटाने गती पकडली...

बाल - बालगंधर्वांचे काम करणाऱ्या मास्टर अथर्व कर्वेनी कमाल केली.. शास्त्रीय गायकाचे इतके बरोब्बर हावभाव त्यानी पकडलेत कि क्या बात हैं! 

आणि थोड्याच वेळात सुरु होतं सुबोध भावे युग... सबंध चित्रपट तो अप्रतिम आहे (माकेउप - विक्रम गायकवाड)... खरच एका स्त्रीला लाजवेल असं तो दिसतो... फक्त जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याच्या धिप्पाड अगं काठी मुले तो पुरुष आहे हे जाणवतं...
पण चेहरयावर अप्रतिम लावण्य... 

अगदी पहिल्या दृशा पासूनच आपल्यावर अभिनयाने तो जबर पकड बसवतो.. बालगंधर्वांचे जेव्हा लग्न एका काळ्या कुरूप मुली बरोबर लावून दिले जाते आणि आंतरपाट दूर झल्यावर त्यांच्या जेव्हा हे लक्षात येते तेव्हाचा धक्का, बायकोच्या इच्छे खातर लग्नाच्या पहिल्याच रात्री स्त्री रुपात येणारे बालगंधर्व,  स्वतःची मुलगी जाते तरी ते रसिकांचा रस भंग होऊ नये म्हणून प्रयोग करतात, मस्त पैकी सर्व विसरून गात असतात पण सहकलाकार मात्र त्यांच्या दुखामुळे रडत असतात हे जेव्हा बालगंधर्वांच्या लक्षात येते आणि नकळत त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागते तेव्हा एक बाप म्हणून त्यांच्या वेदना आणि एक अभिनेता म्हणून सुटलेल्या सांयामाने होणारा त्रागा, त्यांचे अनेकोनेक सहकलाकार देवाघरी जाताना संयत पणे व्यक्त होणार बालगंधर्वांचे अपार दुखं, भारताच्या स्वातंत्र्य साठी आपण काहीच कसे करत नाही याची बालगंधर्वांना लागलेली बोच, जवळच्या मित्रांनी पार फसवल्यावर देणेकार्याला  सामोरे जाणारे धीरोदात्त दिढमूढ बालगंधर्व, एकसंधता नसल्यानी चित्रपट चित्रीकरणात न रमलेले बालगंधर्व, असे अनेक प्रसंग आजही माझ्या मनात कोरलेले आहेत.. आणि अभिनयाचा कळस म्हणजे जेव्हा एका (शेवटच्या) प्रयोगात गात असताना त्यांची कवळी पडते आणि आजारी असल्यानी त्यांच्या घशातून आवाजही फुटत नाही तेव्हा सुबोध भावेंनी दाखवलेली अगतिकता, राग, दुखं, दैन्य, पराकोटीची वेदना (घाश्यामुळे) ह्याला जगात तोड नाही... ह्यावर्षीचा अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळायलाच हवा..

गडकरी (मनोज कोल्हटकर) समर्पक, बालगंधर्वांची पत्नी (विभावरी देशपांडे), त्यांची आई (सुहास जोशी) नेहमी प्रमाणेच अजोड... अमित केळकर आणि सिद्धार्थ चांदेकर गोड दिसलेत पण त्यांना आणि किशोर कदम यांना दुर्दैवानी फारसा वाव नाही... अविनाश नारकर, सागर तळाशीकर हि चपखल.. राहुल सोलापूरकर आणि मनोज जोशी हि उत्तम..

अनंत कान्हेरे ने ऐन प्रयोगात केलेला general Diar (बहुतेक याचाच) चा  खून आणि मग देशभक्ती ने चढणारे स्फुरण आणि अंगावर काटे अजून ताजे आहेत..

चित्रपटाच्या अजून काही जमेच्या बाजू म्हणजे उच्च निर्मिती मुल्ये... निर्मितीत नितीन देसाईनि कुठेहि हात आखडता घेतलेला नाही... चित्रपटाच्या मध्यंतरा वेळी होणारी प्रकाश योजना केवळ अप्रतिम (dop - महेश लिमये) ... मायसाभेचा देखावा नेत्रदीपक.. ज्या चित्रकारांनी तो चितारलाय त्याला सलाम.. मायासाभेची अथांग खोली त्यानी द्विमितीय चित्रात दाखवलीय.. गुणी कलाकार.. वेशभूषेत (costume - नीता लुल्ला) विशेषतः बालगंधर्वांच्या साड्यांसाठी जो पैसा ओतलाय तो समर्पक.. चित्रपटात म्हणाल्या प्रमाणे खरेच नवी fashion यावी इतक्या सुरेख.. कोल्हापूर चे पाणलोट क्षेत्र इतका सुरेख चित्रित झहालय कि थक्क व्हावं... png चे दागिने हटके तरीही कालसुसंगत... आणि एकूणच उभा केलेला जुना काळ, इतर सेट सर्व वाखाणण्या जोगं...

कौशल इनामदार चे संगीत एक सुखद धक्का.. सर्वच गाणी छान जुळून आलीयत.. पण विशेष उल्लेखनीय गाणं झहालय राहुल देशपांडेच... संगीत एवढे छान कि माझ्या सारख्या संगीत नाटकान पासून लांब पाळणाऱ्याला हि एकदा तरी संगीत नाटक बघावं हे वाटावं... (lyrics - स्वानंद किरकिरे)

(writer ) अभिराम भडकमकर हि संवादातून जुना काळ आपल्या समोर उभा करतो, कुठेहि प्रवाही पण न जाता..

खरतर एवढा कौतुकाचा वर्षाव तरीही अप्रतिम कलाकृती का नाही? तर मध्यंतरा आधीचा चित्रपट कमालीच वेगवान आणि धरून ठेवणारा... पण त्यानंतर चा भाग हा खूप drag झहाल्यासारखा... इतका कि हे दोन भाग वेगगळया दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेत कि काय असे वाटावे... बालगंधर्व आणि गोहर बाई चे नाते हि पूर्ण उलगडलेले नाही असे मला वाटले.. (editing - प्रशांत खेडेकर)

पण तरीही दिग्दर्शक रवींद्र जाधव नि पुन्हा एक सुरेख कलाकृती सदर केलीय हे निर्विवाद... आणि मला हा चित्रपट पुन्हा बघयला हि आवडेल..

   

2 comments: