Saturday, August 4, 2012

Kahi Goshti Haravu Nayet Mhanun - 4

ही वेळ निघून जाईल...

फार वर्षां पूर्वीची गोष्ट आहे. विक्रमादित्य नावाचा राजा कपिला नगरीवर राज्य करत होता.

राजा मोठा धर्मशील होता. पराक्रमी होता. आपल्या प्रजेवर त्याचे निरातिशय प्रेम होतं. नागरी मधेही सगळेच अलबेल होते. सुख, समृद्धी, शांती आणि समाधान सगळी कडे नांदत होते. प्रजेलाही राजाविषयी प्रेम आणि आदर होता. राजाची सुंदर सत्वशील  पत्नी, एक उमदा राजपुत्र, गोंडस राजकुमारी... असं अगदी दुष्ट लागण्या सारखं सगळं चाललं होतं. त्यामुळे राजाही खुश होता.

एके दिवशी तो विचार करतो की 'सगळ उत्तम चाललय तर प्रजेला एक छानशी मेजवानी द्यावी आपण... आपलं प्रजेवरच प्रेम व्यक्त करायला ह्याहून चांगला उपाय नाही आणि खरतर आपल्याकडे कारण ही आहेच की... पुढच्याच मासात आपला जन्मदिवस आहे'.

तो राणीशी बोलतो आणि मेजवानीचा बेत पक्का ठरतो... नगरीत सर्वदूर आमंत्रणं जातात. राज्यातला सर्वांना अगदी झाडून निमंत्रणं जातात. इकडे राजमहालही मेजवानी साठी चांगलाच सजतो. उंची शामियाने उभारले जातात... देशविदेशातून नामांकित आचारी बोलावले जातात... सगळी कडे जणू उत्सवाचं वातावरण असतं.

आणि अखेरीस मेजवानीच दिवस उजाडतो. गावातील लहाना पासून वृद्धापर्यंत, राव पासून रंका पर्यंत आणि मूढा पासून योगी ऋषींपर्यंत सगळे जातीनं हजर असतात... सगळ्यांनी आपल्या लाडक्या राजाला त्याच्या वाढदिवसाची काहीना काही भेट आणलेली असते. राजा खूप प्रेमानी सगळ्यांची भेट स्वीकारतो... सगळ्यांना जेवून जाण्यास सांगतो आणि जातीनं प्रत्येकाला हवं नको ते पाहतो... बेत फक्कडच असतो. सगळे पोटभर जेऊन, तृप्तं होऊन, राजाला अनेकानेक आशिर्वाद, शुभेच्छा देऊन आपापल्या घरी निघून जातात.

सगळे गेल्यावर राजा राणी एक एक करून भेटवस्तू पाहू लागतात. प्रत्येकानी आपापल्या ऐपतीप्रमाणे राजाला फुल ना फुलाची पाकळी भेट म्हणून दिलेली असते. प्रजेचं  त्याच्याविषयीचं प्रेम पाहून राजाही खूप खुश होतो. आणि तेवढ्यात राजाची नजर गावाबाहेरच्या एका साधूने दिलेल्या भेटवस्तू कडे जाते. ती एक पाटी  असते. त्यावर एक वाक्य कोरलेलं असतं "ही वेळ निघून जाईल".

तत्क्षणी राजाचा चेहेरा बदलतो. रागानी तो अक्षरश: थरथरू लागतो. गावाबाहेरच्या त्या साधूचा त्याला प्रचंड राग येतो. इतकं सगळं छान चालू आहे, ऐश्वर्य आहे आणि हा नीच साधू म्हणतो हि सुखाची वेळ निघून जाईल? काय म्हणावं काय अश्या माणसाला...??? हा साधू नाहीच.  नक्कीच कोणीतरी भोंदू बाबा असणार.

लगेचच राजाचा हुकुम सुटतो, "जिथे असेल तिथून त्या  साधूला कैद करा आणि कारागृहात डांबून ठेवा". झालं राजाच्या इच्छे प्रमाणे होतं. त्या साधूची बाजू ऐकूनही न घेता, त्याला सरळ कारागृहात डांबलं जातं.

अशीच काही वर्ष सुखा समाधानात जातात. राजा त्या साधू आणि  त्या पाटी बद्दल पूर्ण विसरलेला असतो. पण नियतीच्या मनात काही वेगळच असतं  . राजाच नशीब पालटतं. कपिला  नगरीवर भयंकर दुष्काळाच सावट पसरतं. नगरीतल्या नद्या आटतात, विहिरी कोरड्या पडतात, सगळी पिके करपून जातात. राजा आपले धान्यागार प्रजेसाठी रिते करतो. प्रजेसाठी नव्या विहिरी खोदतो. त्यावर्षी कसेबसे भागते पण पुढच्या वर्षीही  तीच परीस्थिती... आता राजा कडे पर्याय नसतो. राजा आपला सगळा खजिना रिकामा करतो आणि परराज्यातून अन्यधान्य आणि पाण्याची व्यवस्था करतो.

इकडे आसपासच्या राज्यांना कपिला नगरीची ही अवस्था कळते. राजाचा वाईट काल आल्याचे पाहून एरवी राजाचे नाव काढताच ज्यांची पाचावर धारण बसायची असे कपिला नगरीच्या आसपासचे छोटे राजे डोकी वर काढायला लागतात. कपिला नगरी गिळंकृत करण्याच्या उद्देशाने चोहोबाजूनी परकीय आक्रमणे होतात.  दुष्काळानी आधीच संत्रस्त झालेले सैनिक तरी किती तग धरणार? अती बलाढ्य अश्या कपिला नगरीचा सपशेल पाडाव होतो. राणीला, राजपुत्राला आणि राजकन्येला कैद करून इतर राजे घेऊन जातात. राजा पार देशोधडीला लागतो. नियतीचे फासे फिरले कि असेच व्हायचे.

राजा विमन्सक अवस्थेत रानोमाळ भटकत असतो. त्याला काय करावे ते सुचत नसते. गेलेले वैभव आपला परिवार कसा परत मिळवावा ते काळात नसते. त्याला उमगत नसते की आपण असे काय पाप केले म्हणून आपल्यावर ही वेळ आली? हा कसला शाप भोगतोय आपण?

यातून काहीच मार्ग दिसेना तेव्हा राजाचे मन कलुषित व्हायला लागते. तो विचार करतो, की अश्या लाचारीच्या जगण्यापेक्षा मरण बरे. राजा इतका हताश होतो की आत्महत्येचे विचार राजाच्या मनात येऊ लागतात आणि त्याच्यावर तो अंमल करायला ही निघतो.

कपिला नगरीच्या उंच पर्वतशीखरावरून तो उडी मारणार तेवढ्यात गावा बाहेरच्या त्या साधूने दिलेल्या त्या पाटीची त्याला आठवण होते. "ही वेळ निघून जाईल". हे वाक्य वाचून तेव्हा केवढा राग आला होता राजाला पण आता  हेच  वाक्य राजाला कमालीची उभारी देऊन जाते - "ही वेळ निघून जाईल". किती योग्य आहे हे वाक्य. राजाला मनोमन पटते जसा चांगला काळ राहिला नाही तसा हा वाईट काळही राहणार नाही. राजाच्या अंगात नवीन उत्साह संचारतो आणि त्याला त्याची चूक कळते. काहीही ऐकून न घेता आपण त्या साधूला कैदेत टाकले. पण आता ही वेळ पश्चातापाची नाही तर कृतीची  आहे. आपले राज्य, आपले गातवैभव आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे आपले कुटुंब परत मिळवायलाच पाहिजे असे राजा पक्के मनाशी ठरवतो.

ब्राह्मण वेशात राजा नगरीत राहायला लागतो आणि हळू हळू आपल्या जुन्या सैन्याशी संपर्क करतो. त्या पुण्यश्लोक राजाला मदत करायला कापिलावासी आनंदानी होकार भारतात. राजा सर्व तयारीनिशी जेत्या राजांवर आक्रमण करतो. सगळे पराक्रमाची शर्थ करतात आणि हळू हळू कपिला नगरी परकीय राजवटीतून मुक्त होते.

राजाला त्याचे गतवैभव, कुटुंब सर्व परत मिळते. तो कैदेतून त्या साधूला बाहेरकाढतो त्याची मनापासून माफी मागतो, त्याचा यथायोग्य सत्कार करतो आणि मोठ्या सन्मानी त्याला परत पाठवतो.

आणि आता अजून तरी राजाची सुखाची वेळ निघून गेलेली नाही.



Tuesday, May 29, 2012

Kahi goshti visarunayet mhanun - 3

दु:खाची पोती 

फार पूर्वीची गोष्टं आहे... जगातली सगळी माणसं आपापल्या दु:खानी अगदी वैतागून गेली होती... सगळ्यांना वाटायचं की देव आपल्याशीच असं का वागला? म्हणजे मला एवढं मोठ दु:खं आणि बाकी सगळ्यांची इवलीशी दु:खं ... मीच असं काय  पाप  केलाय  मग  माझ्याच  वाट्याला का ही दु:खं ...

आणि गंमत  म्हणजे सगळ्यांनाच असं वाटत होतं... मग काय... एके दिवशी सगळे लोक एकत्र आले आणि आपापल्या दु:खाचं पोतं उचलून  सरळ  देवा कडे आले... 

एवढ्या सगळ्या लोकांना एकदम  आलेलं पाहून देव बाप्पा ही जरा गांगरून  गेले... जरा गोंगाट शांत  झाल्यावर  त्यांच्यातल्या एका म्होरक्याने आपलं गाऱ्हाणं देवाला सांगितलं... देवानी एक  क्षण  भर  विचार केला मग  सगळ्यांना म्हणाला कि एक काम  करा, आपापली दु:खाची पोती तो तिथे कोपरा दिसतोय  ना तिथे नेऊन ठेवा.. देवाच्या सांगण्या प्रमाणे सगळे आपापली पोती नेऊन  ठेवतात... 

मग  देव म्हणतो,"आता असं बघा, मी हि भूलोकीची पोती माझ्याकडे कडे काही ठेऊ  नाही शकत... मला हि काही नियम पाळावे लागतात  बाबानो... पण  तुम्हाला एक मदत करू शकतो... नियमांना थोडी बगल मारतो आणि तुम्हाला अशी परवानगी देतो कि तुम्हाला जे पोतं  हलकं वाटतंय ते तुम्ही घ्या आणि सुखानी परत जा ... म्हणजे अश्यानी माझ्याकडची सगळी पोती ही संपतील  आणि तुम्हाला कमी दु:खाची हलकी पोती ही मिळतील... काय ? पटतोय  का उपाय...?"

देवाच्या ह्या उपायावर सगळे बेदम खुश झाले... त्यांना आत्ता पासूनच हायसं वाटायला लागलं... सगळे हो म्हणतायत  न  म्हणतायत  तोच  "तथास्तु" म्हणून  देव  आंतर्धान  पावला...

मग  काय... देवानी  सुचवल्या प्रमाणे सगळेजण  आपल्याला हलकं वाटेल  ते पोतं उचलून  चालू  लागले... पण  ते थोडं फार अंतर गेले असतील  नसतील  तोच त्यांना आपल्या पाठीवरचं  मगाशी हलकं वाटणारं पोतं कमालीचं  जड वाटू लागलं... अजून  थोडं अंतर गेल्यावर त्यांना हे पक्क कळून  चुकलं  कि आपलाच  पोतं इतरांपेक्षा हलकं  होतं.... 

पण  आता सौदा झाला होता... देव अंतर्धान  पावला होता....

courtesy: वादळवाट 

Monday, March 26, 2012

Kahi goshti haravu nayet mhanun - 2

साधु आणि दरी

एक साधु हिमालयाच्या डोंगर दर्यातून भटकत असतो... दररोज भगवंताची आराधना करावी, ध्यान धारणा करावी आणि सृष्टीतील ईश्वरास धुंडाळत भटकत राहावं असा त्याचा रोजचा दिनक्रम...


एके दिवशी असाच फिरत फिरत तो एका उंच, दुर्गम अश्या कड्यावर चढून गेला.. रस्ता मोठाच कठीण.. खडतर, खाच खळगे असलेला.... वर चढे पर्यंत त्याची पूर्ण दमछाक झाली... हिमालयाच्या भर थंडीत त्याला कष्टानी दरदरून घाम फुटला, पाय बोलत होते... थकवा आला होता... पण समोर बघतो तो काय... खाली दिसणाऱ्या दरीच मनोहारी विहंगम दृश्य.. बघता क्षणी त्याचा थकवा पार कुठल्या कुठे उडून गेला... ते असीम सृष्टी सोंदर्य पाहून जणू त्याची समाधीच लागली... भूतलावर स्वर्ग अवतरला होता तिथे.. त्याला ईश्वराचा साक्षात्कारच जणू झाला..


तो साधु त्या मनोवेधक दृश्याच्या इतक्या प्रेमात पडला कि त्याला त्याचे जीवन तिथेच संपवसे वाटले... याहून अनोखे ह्या जगात काहीच असू शकत नाही ह्याची त्याला खत्री पटली आणि बघता बघता त्याने त्या दरीत उडी घेऊन आत्माहुती दिली...

वर्षान मागून वर्ष उलटून गेली.. युगान मागून युगे... ते लोभस दृश्य पाहण्याचे परम भाग्य कोणाच्याच नशिबी नव्हतं... पण एके दिवशी अचानक असाच एक मस्त कलंदर योगी पुन्हा त्याच जागी पोचतो...

त्यालाहि त्या पहिल्या साधु प्रमाणेच तेथील ईश्वरी अस्तित्वाची प्रचीती येते... तो हि पुरता मोहरून जातो आणि त्याची हि खात्री पटते कि ह्या हून स्वर्गीय असे काहीच नाही... त्याच्या हि मनात विचार येतो कि बस इथेच आपले आयुष्य संपून जावे... पण क्षणभरच...

त्याला जाणवते कि जर आपण आपले आयुष्य इथेच संपवले तर अजून कोणी इथे येई पर्यंत हे अतीव सुंदर दृश्य कोणीच बघू शकणार नाही.. अजून कोणालाच ह्या ईश्वरी कृपेचा प्रत्यवाय येणार नाही.. जर आज आपण हे दृश्य इतरान ना दाखवले नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे...

आणि तो त्याचं उर्वरित आयुष्य लोकांना त्या कड्यावर घेऊन जाऊन ते विभोर दृश्य दाखवण्यात घालवतो...
त्या कृपाशील योग्या मुले आज कित्येक लोकांना तिथे ईश्वरी साक्षातकार झाल्याचं लोक सांगतात...

Saturday, January 21, 2012

Kahi Goshti Haravu nayet mhanun - 1

ससा कासव and changing trends of management 

१---------------------

ससा आणि कासव दोघे हि शर्यत लावतात कि जो कोणी पहिला त्या दूरवरच्या टेकडी वर आधी चढून दाखवेल तो जिंकला... सश्याला आपल्या वेगाचा प्रचंड अभिमान आणि आपण कासवाला कसेही हरवू हा विश्वास...

ससा त्याच्या अंगभूत वेगामुळे जोरात पाळायला लागतो पण कासव मुळातच संथ, त्यामुळे ते डुलत डुलत पण प्रामाणिक पणे चालत असतं...

साश्यानी आता जवळ जवळ निम्मं अंतर कापलेलं असतं... तो मागे वळून बघतो तर कासव अजूनही खूप मागे असतं... ससा स्वतःच्याच वेगावर जाम खुश होतो आणि विचार करतो कि "कासव अजून बरच लांब आहे... ते काही इतक्यात येऊ शकत नाही... म्हणजे आपण शर्यत जिंकलो हे जवळ जवळ निश्चित आहे... तर मग काय हरकत आहे, जरा चार खाऊ, गार पाणी पिऊ, आणि मग निघू"...

झालं... ठरल्या प्रमाणे ससा मऊ चार खाऊन, गार पाणी पेऊन जरा पेंगुळलासा होता आणि त्यात झुळझुळ वाहणारं वारं आपली जादू चालवत... साश्यावर झोपेची चादर पसरते आणि बघता बघता ससा अगदी गाढ झोपी जातो...

ससा झोपी गेला खरा पण इकडे आपलं कासव मात्र न थकता चालत होतं... मजल दरमजल करत त्यानी सश्या पर्यंतचा अंतर कापलं... झोपलेल्या सश्या कडे एक नजर टाकली आणि पळभरही विश्रांती न घेता मार्गस्थ झालं... त्याला आता फक्त डोंगराचं शिखर दिसत होतं...

होता होता दुपार टाळून गेली, संध्याकाळचं गार वारं वाहू लागलं आणि आपल्या ससोबाना जाग आली... पण आता मात्र त्यांची पाळता भुई थोडी झाली... त्याला आपण किती वेळ झोपलो याचा अंदाजच येईना... मग तो जी धूम ठोकतो ती थेट डोंगराच्या माथ्यावर..

पण बघतो तर काय... कासव आधीच तिथे पोचलेलं... त्याला घडला प्रकार कळतो... आणि जिंकलेल्या कासवा समोर खजील मानेने चालु लागतो...

Moral of the story - १. slow and steady wins the race   
                               २. consistency and perseverance gives you success 
                               ३. गर्वाचे घर खाली  

२---------------------------------------------

कासवा सारख्या संथ प्राण्या कडून हरलेला ससा आता पुरता शहाणा झलेला असतो... आणि हरण्या मुले जी नामुष्की झालेली असते ती आपण कधी एकदा धुवून टाकतो असा त्याला झालेलं असतं...

झालं... ससा पुन्हा कासवा कडे जातो आणि म्हणतो पुन्हा शर्यत लावू आपण... पहिल्यांदा मिळालेल्या अनपेक्षित विजया मूळे कासवाला जरा तसू भर मास चढलेलं असतं आणि ऐटीत तो सश्याला हो म्हणून जातो...

ठरलं.. त्यांची शर्यत सुरु होते... ह्यावेळी साश्यानी जिंकण्याचा चंगच बांधलेला असतो... तो सुसाट वेगानी पळत सुटतो आणि डोंगराचं शिखर गाठल्यावरच थांबतो...

अर्थातच कासव हरलेल असतं आणि साश्यानी त्याचं अपयश धुवून काढलेलं असतं...

Moral of the story - १. fast and furious wins the race 
                               २. encash your  strenghts and kill the competitor  

३..........................................................

आता मात्र कासव हट्टाला पेटलं... एकदा जिंकण्याची झिंग चढली कि हरणं सहन होत नाही... तो सारखा विचार करी... कि मी असं काय केलं पाहिजे ज्यानी मी सश्याला हरवू शकेन... आणि शेवटी त्याला एक नामी युक्ति सुचते...

ताड ताड पावलं टाकत तो साश्याकडे जातो आणि म्हणतो चल आपण परत शर्यत लावू... विजयी ससा ऐटीत  एक नजर कासवा कडे टाकतो आणि हो म्हणतो... पण कासव ह्या वेळी एक अट सांगतो... "डोंगरावरच जायचय पण मी सांगीन त्या मार्गांनी"... विजयाच्या धुंदीत ससा त्यालाही हो म्हणतो...

शर्यत सुरु होते.. थोडं अंतर कासावनी सांगितलेल्या रान वाटेनी ससा धावून कापतो न कापतो तोच त्याच्या समोर एक विशाल नदीचा पाट येतो... आणि पाटा समोर लगेच डोंगर... ह्यावेळी अंतर तर कमी पण पाण्याचा अडसर पार केल्या शिवाय गत्यंतर नाही... काय करू न काय नाही ह्या विचारात ससा असतानाच लुटू लुटू पायांनी कासव तिथे पोचतं.... सुरकन पाण्यात शिरतं आणि डोळ्यांचं पात लावतं न लावतं तोच पैल तीरावर पोचतं.... आणि हळू हळू पुन्हा शिखरावर चढू लागतं...

बिचारे आपले ससोब मात्र किनाऱ्या वरच गोरठून बसलेले... 

कासवाची युक्ति कमी येते आणि कासव पुन्हा एकदा शर्यत जिंकते...

Moral of the story - १. Work on your core competencies and specialize....

४---------------------------------------------

दोघातच लढाई करून आता मात्र ससा कासव bore झालेले असतात...

आता ते ठरवतात... आपण दोघातच कुठे लढत बसायचं... आपण सगळ्या जंगलाशी शर्यत लावूयात...

आणि ते असा मार्ग ठरवतात कि अर्धा रस्ता हि रानवट असतो आणि अर्धा रस्ता पाण्यातून जातो...

एकुणातच ससा कासवाच्या शर्यती संपूर्ण जंगलात खूपच famous झालेल्या असतात आणि इतर सगळे प्राणी ह्या दोघांशी शर्यत लावायाल तयार होतात...

शर्यत सुरु होते खरी पण पाण्यात राहणारे प्राणी जमिनी वर येताच मंदावतात आणि जमिनीवरचे प्राणी पाण्याला घाबरून बसतात...

पण इकडे ससा कासवाची जोडी चांगलीच यशस्वी होते कारण जमिनी वर ससा कासवाला आपल्या पाठीवर घेऊन पाळतो आणि पाण्यात कासव सश्याला आपल्या पाठीवर घेऊन पोहोते...

ह्या दोघांच्या या युती मूळे मी मी म्हणणाऱ्या प्राण्यांवरही हरण्याची पाळी येते...

Moral of the story - १. team work is always better than individual efforts...

                                


Saturday, August 27, 2011

Jeevan tyana kalale ho...

रुक्साना.... काश्मीरच्या दूर्गम आणि आतंकवाद बाधित एका पाड्यावरची, १९ वर्षांची तरुणी... नववी पर्यंत शिकूनही आपल्या इथल्या अशिक्षित मुली पेक्षाहि जाणवण्या इतपत कमी आत्मविश्वास... साहजिक च आहे म्हणा, zero exposure... पण अश्या ह्या मुलीनी भल्या भल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारा पराक्रम केला त्या विरांगने ची हि गोष्ट... २००९ सालच्या शेवटी शेवटी घडलेली...

काश्मीर मध्ये आतंकवादी आणि नागरिक गेले कित्येक वर्ष एकत्र राहतात... त्यातल्याच ३ अतिरेक्यांची वाईट  नजर रूढार्थाने सुंदर नसलेल्या रुक्साना वर पडते.. निर्लज्जपणे ते तिच्या कडे तसा प्रस्ताव हि ठेवतात, रुक्साना त्यांना झिडकारून घरी येते आणि अपेक्षे प्रमाणे रुक्सानच घरा बाहेर पडणं मुश्कील होऊन जातं... (रुक्साना मुस्लीम म्हणून त्या अतिरेक्यांना काही कणव नसते... धर्म युद्धाच्या नवा खाली विकृती पोसणारे दानव हे) तरीही ती धीराने सामोरी जात असते.. एक दिवशी रात्री अतिरेकी सरळ तिच्या काकाच्या घरात दाखल होतात आणि धमकावून रुक्सानच घर दाखवायला सांगतात... जीवाच्या भयाने तोही मुकाट त्यांना रुक्सानाच्या घरी घेऊन येतो.. 

बंद दार उघडत नाहीत हे बघून, ते दार तोडून अतिरेकी रुक्सानाच्या घरात शिरतात... इकडे रुक्सानाच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकते... पण अल्ला कि मेहेरबानिसे रुक्सानाला बाजे खाली लपवण्यात तिची अम्मा यशस्वी होते...

आधीच वासनेने आणि रागाने आंधळे झालेले अतिरेकी ती दिसत नाही म्हणून वेडे पिसे होतात... तिच्या घरच्यांना मारपीट सुरु होते... रुक्साना तर त्यांना हवीच असते पण आता त्यांची अजून एक मागणी असते कि तिच्या धाकट्या भवानी अतिरेक्यांचा गटात सामील व्हावं... 

त्यांच्या ह्या मागण्यांना रुक्सानाच्या घरचे बधत नाही म्हणाल्यावर त्यांच्या वर बंदूक उगारतात... बाजे खालून हे सगळं बघत असणाऱ्या रुक्सानाला अचानक काय प्रेरणा मिळते माहित नाही... बाजे खालीच पडलेली कुऱ्हाड उचलून रुक्साना बाहेर येते आणि एका अतिरेक्याच्या पाठीत सणसणीत वार करते... तो तिथल्या तिथे कोसळतो.. ह्या अनपेक्षित हल्ल्यांनी बावचाललेला दुसरा अतिरेकी तिच्या काकावर गोळी चालवतो.. हि बया त्याच्यावरही हल्ला चढवते आणि त्याला हि जखमी करते... तिचा हा अवतार बघून दोघे हि अतिरेकी पळून जातात...

आपल्याला बरं वाटतं.... गोष्टी चा सुखांत झाला... गोष्ट संपली... पण नाही गोष्टं अजून अर्धीच आहे... हे आपल्याला KBC (कौन बनेगा करोडपती) चा एपिसोडे पुढे गेल्यावर कळत... कारण एका special segment under रुक्सानाला KBC मध्ये बोलावलेला असतं... social responsibility म्हणून खूप स्तुत्य प्रयत्न...

अत्यंत बुजरेपणे, कावरी बावरी रुक्साना प्रवेश करते... तिला प्रश्नही सोपे विचारले जातात... आपल्याला काहीही न गमावता charity केल्याचे समाधान मिळतं... तिचा विषयी चा अभिमान कमी होऊ लागतो... आणि त्याची जागा तिच्या विषयी वाटणारी कीव घेते... आणि  आपला ego मोठा होतो... (सोपे प्रश्न मुद्दाम दिलेत आणि हे माहित असूनही आपण show बघतोय, trp वाढवतोय म्हणजे उपकारच नाही का)

असो... मग अमिताभ बच्चन तिला विचारतो कि "५ करोड रुपये... क्या किजीयेगा इतने सारे पैसोन का" म ती सांगते कि "मुझे मेरे बच्चे के लिये घर बनाना हैं..." (आपल्याला आश्चर्य वाटतं कि ह्या पोरसवदा मुलीला मुलगा आहे?) आपलं social मन अजून हळहळत आणि ego अजून वाढतो...

होता होता ती एक लाख साठ हजार रुपये जिंकते... अमिताभ पुन्हा विचारतो, कि काय करणार या पैशांचं...? आणि मग ती जे उत्तर देते त्यांनी सणसणीत चपराक बसते आपल्याला... धाड्कन जमिनीवर येतो आपण... ती म्हणते "साठ हजार गरीबो मैं बाटूंगी और एक लाख मैं घर"...

च्या मारी... जेव्हा आमच्या कडे २ BHK घर होतं तेव्हा मोठं घर हवं होतं आता ४ BHK आहे तर interior करायचं.... charity तर माझ्या मनाला शिवतही नाही... आणि हि बाई जिच्या तान्ह्या बाळासाठी घर नाही ती स्वतःला मिळालेल्या अवघ्या १ लाख ६० हजारातले ६० हजार असेच देऊ करते...? (आणि हे आपल्याला माहित असतं कि हा काही publicity stunt नाही कारण सुदैवानी exposure च नसल्यानी ह्या गोष्टींचा तिला स्पर्श हि झलेला नाही... जे काही आहे ते निर्भेळ...)

इथेच हे सगळं थांबत नाही... अजून आपल्या लाजेची काही लक्तरं टांगायची बाकी असतात...

बोलता बोलता कळत ज्या अतिरेक्यांना हिने पळवून लावलेलं असतं त्यांनी फतवा काढलेला आहे (वर्तमान काळ मुद्दामून वापरलाय)... कि हिला जो कोणी त्यांच्या स्वाधीन करेल त्यांना ६ लाख रुपये मिळतील... (आहो आपल्याला हि रक्कम मोठी वाटते म कोण्या एका उपाशी खेड्यातला कोणालाहि हि रक्कम मोठी च आहे)

मग तिला अमिताभ म्हणतो तुला भीती नाही वाटत ह्या सगळ्याची...? तर पठ्ठी म्हणते "भ्यायचं का? जिस अल्ला ने उस वक़्त बाचाया वो अभी भी बचायेगा..."

अजून एक चपराक.... अरे देवा... एवढ्या तेवढ्या कारणाने देवावर रागावणारे आपण आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत असूनहि देवावर अढळ विश्वास असणारी हि रुक्साना...

त्यापुढे जाऊन अमिताभ विचारतो कि नववी नंतर का शिकली नाहीस तर तिचं उत्तर असतं अतिरेक्यांनी शिकून दिलं नाही... मुली शाळेत निघाल्या कि त्यांना रस्त्यात अक्षरशः बदडून काढलं जायचं (दैत्यच ते...)

मग बोलता बोलता तिच्या नवऱ्याशी - कबीर शी आपली ओळख होते...हिच्या चेहऱ्या वरून हीचं बाल्य हि हटलेल नाही... आणि तिचा नवरा प्रौढ असा तिशी गाठलेला  "माणूस"??? का बरं....? 

मग कळत.... तिच्या protection साठी government नि police मध्ये काम करणाऱ्या कबीर ला नियुक्त केलेलं असतं... तो म्हणतो कि हिला जेव्हा बाहेर जायचं असायचं तेव्हा मी तिला जीप नि घेऊन जायचो आणि अतिरेकी आले कि सीट खाली लापावायचो... मी तिला सांगितलं होतं कि पहिली गोळी मी खाईन आणि मगच तुला काहीतरी होईल...

कबीर च्या protection खाली दिवस चालू असतात पण तिच्याशी कोणी लग्न करायाल तयार नसतो... कारण त्या फतव्यात हे हि लिहिलेला असतं कि जो कोणी हिच्याशी लग्न करेल उसके पुरे खानदान का खात्मा होगा...

ह्याही वेळी तिच्या मदतीला कबीर धावून येतो आणि स्वतःचेच नाही तर कुटुंबाचे प्राण धोक्यात असतानाही तो तिच्याशी निकाह करतो... (म्हणून एवढा मोठा नवरा) अजून एक चपराक... खाड...
पण लग्न झाल्यावर त्यांचा त्रास वाढतो.. अतिरेक्यानपायी त्यांना त्यांचे गाव सोडून पळून जावं लागतं... (म्हणून नसतं त्यांचं घर...)

आता मात्र आपण पूर्ण नामोहरम झालेलो असतो... आणि आपल्याला प्रश्न पडतो कि आयुष्य कोणाला कळलं हो...? उच्च विद्या विभूषित, AC office मध्ये बसून fb वर, किंवा ५ star हॉटेल मध्ये बसून चर्चा करणाऱ्या आपल्याला कि काश्मीरच्या एका दुर्गम खेड्यात राहणाऱ्या अर्धशिक्षित रुक्साना ला....???

Friday, August 19, 2011

Vanawa pet ghet aahe...

They say history repeats... and I had no reason to believe it till yesterday... But now I do.. I strongly do...

It had happened in the early 20th century... when Mahatma Gandhi called for a peaceful war against British raj.... and now its happening again in the early 21st century when Shri Anna Hazare called for a peaceful war against "our own" corrupt government... Yes it happens only in India that peaceful agitators shake the strong pillars of unauthorized / unjustified government...

 Now India has accepted Anna Hazare and his capable team to lead her in the war against corruption... Whole nation is resonting with his call.... there are peaceful agitations, rallies, silent marches, candle walks and most importantly - 'traffic jams' (because of rallies) we are proud of...

There are rounds of anshans, there is FL (fasting leave), there is holi (fire) of government version of lokpal bill, there is civil order disobedience, there is movement of self arrest and what not.... India is burning...

Every nook and corner of India wants an Indian political system free from corruption... Be it a small village in the interiors of Assam or a posh locality in a breath taking skyline of Mumbai... Every where there is a loud scream against corruption... because we have had enough of it... we are really tired of it and we want to get rid of it now... NOW....

Every Indian wants a corruption free India... Bharat is protesting as hard as India is... The class is fighting and mass is fighting too... teens are fighting, youths are fighting, middle aged and age olds are fighting too... Males are fighting and females are fighting too... Industrialists are fighting and artists are fighting too... No one wants to be left behind in this war against the political system that just not supports but protects the corrupts... (Doesn't it remind us the history lessons?)

So true Anna is when he calls this struggle as 2nd Freedom Fight of India!... We are now very well determined  to end this 64 year long (counting from 15th August 1947) era of corrupt India...

Media is also playing a very critical role in shaping up this freedom struggle... One must appreciate its commitment to this cause... The amount of coverage they are giving to whole of this act is really benefiting the Anna's team...

... plus the best part of this 2nd freedom fight (and which was lacking in early 20th century) is the wide spread of social media... we have one more channel to vent out our anger and rage... Almost every one is updating there FB statuses with a word or two against corruption... Few say "I am Anna", few of them are cursing government, few of them supporting Anna, few of them have pledge to change their profile photographs to Anna's photo till the time we win this battle... Though negligible but this has helped to spread the awareness among the youth...

**********************************************************************************
Pune Bulletin -
Rally from Balgandharva to Alka, SP college rally on Tilak Road, Agitations on Sinhagad Road
**********************************************************************************
Actually if you see this war is not against any particular political party... Its against the whole system which feeds corruption... and broadly speaking no single party is an option to this.... but this time it happens to be UPA.. They have screwed it big time... Now its time for them to bare the brunt...

Thankfully our corrupt government has already shown the signs of their weakening stand by accepting conditions of Anna... Now nothing much is left in their hands when whole India has awaken to the needs of time... So now there is much surety that long awaited "Jan Lokpal Bill" will see the light of the day with out much of  a modification, as like RTI (Right to Information) Act...

RTI backfired the government and JLB will do the same task even more ferociously...

... and for this we must give whole credit to Shri Anna Hazare who holds the power to fire the asses of generally 'peace loving' Indians and ably directing us through this 'do or die' war against corruption...

Sounds good...??? But wait.. there is no end to this here...

Its fine we are all burning now and the JLB shall pass through the parliament... But real challenge is to keep this fire burning till coming assembly elections... and because we are very forgiving and I would not wonder if this totally corrupt government again comes in power in 2014... 3 years is quite a span.... (this is the only drawback of this fight) and if this happens then there would not be any shameful event in the history of India as this...

I agree that we do not have any better option than UPA as (though UPA has a long history of corruption), BJP and allies do not have any trustworthy leader to offer us... but still I would suggest that we keep on changing our governments every 5 years for at least next 20 - 25 years. This will make the political stage little turbulent every 5 years and stock markets would drop a little on the backdrop of this unstable government but this is the price we need to pay for allowing 64 years of corruption... this will ensure that there is enough manthan (churning) and we get the nectar in the form of corruption free India... (Each and every Indian should vote for this to happen ... and should vote religiously...)

P.S.: This is my 1st blog in English because unfortunately very few would take the pain to read it if it would have been written in Marathi... and I want more and more people to read this one and take the oath to vote in every single election and as long as they are living...

Monday, July 25, 2011

Tajmahal kharach ekadach banu shakato ka..???

नाई, title आणि खालील blog चा काही direct संबंध नाहीये.. खरतर नुकताच झीन्दगी ना मिलेगी दोबारा... पाहून आलोय आणि झोया अख्तर सारख्या माझ्या खूप लाडक्या दिग्दर्शिके कडून घोर निराशा पदरी पडून घेतलीय..

आज वरचे तिचे दोन्ही चित्रपट - honeymoon travels Pvt . Ltd . आणि luck by chnace मला कमालीचे आवडलेले चित्रपट.. honeymoon मध्ये परीकथे सारख्या गोष्टी आहेत पण दोन्ही चित्रपटानमध्ये खूप जबरदस्त पटकथा आहे.. luck by म्हणजे तर तिची सर्वोत्तम निर्मिती.. दोन्हींमध्ये अगदी आपल्यातली वाटणारी पात्रं... हृदयाला भिडणारी त्यांची नाती, कथा आणि व्यथा..

आणि इतक्या २ fundoo चित्रपटान नंतर तिचा हा नवा चित्रपट... म्हणजे अर्थातच अपेक्षा कमालीच्या उंचावलेल्या... त्यातून इतकी तगडी star cast... कितीही रुपायचे ticket असू देत.. मी चित्रपट पाहायला गेलो आणि २०० रुपये देऊन स्पेन ची सांस्कृतिक, भौगोलिक इत्यादी माहिती असलेली discovery वरची एक ३ तासांची short film पाहून आल्या सारखा वाटलं...

म्हणजे दृश्य अगदी नयनरम्य.. fear factor वाले stunts हि एक सेकंद काळजा चा ठेका चुकवतात.. पण झोया सारख्या आत्यंतिक realistic दिग्दर्शिकेला  अशी larger than life presentation ची काय गरज भासावी..?? आणि चित्रपट पाहिल्यावर (मला माहितीय कि मी picture किती हि वाईट आहे हे सांगितलं तरी तुम्ही तो जाऊन बघणार कारण याचं मार्केटिंग च इतकं छान केलाय आणि कदाचित तुम्हाला तो आवडेल हि.. कारण मला फार थोडे चित्रपट आवडतात..) तुमच्या सहज लक्षात येईल कि मुळातच पटकथेत काहीच दम नसल्यानी तिला कारण जोहर सारखी बिग budget फिल्म काढणं भागच होता नाहीतर कोणीच तो चित्रपट पहाणर नाही..

असो.. चित्रपटात गोष्ट आहे तिघा लंगोटी यारांची.. (असं ते म्हणतात म्हणून कळत पण सबंध चित्रपटात त्यांची ती गहिरी मैत्री वैगरे जी काय आहे ती कुठेच साधी जाणवतही नाही मनाला शिवून जाण तर दूरच राहिलं.. त्याच विरोधात DCH किंवा RDB मधली ३ ची मैत्री कशी मनात घर करून राहते..) तर असे हे तिघे त्याच्यातील एका मित्र च्या bachelor party ला स्पेन ला जातात... म्हणजे तसे त्यांनी clg मध्ये असताना ठरवलेले असते.. आणि त्यांनी असे हि ठरवलेले असते कि तिथे गेल्यावर प्रत्येक जण एक adventure sport ठरवेल आणि तो तिघानाही खेळावा लागेल.. आणि प्रत्येकांनी ठरवलेला तो sport हे इतर दोघान साठी surprise असेल..

तर अश्या या ३ मित्रांची स्पेन मधली adventure सफर फारशी कुठली हि वळण ना घेता २.५ - ३ तासांनी संपते.. संपते बाबा एकदाची...

नाही म्हणायला चित्रपट काही काही punches खूप छान आहेत.. आपल्याला हसू हि येत पण ३ तासान नंतर हाती काहीच लागत नाही.. काहीतरी मस्त, कमाल, धमाल, entertaining असं काहीच आपण पाहिल्याचं वाटत नाही...

मला हेच कळत नाही कि जर हे तिघे अगदी शाळे पासूनचे घनिष्ट मित्र आहेत तर आपला जवळच्या मित्राची सोच कि पोहोच काय असेल हे आपल्याला कळत नाही..?? म्हणजे आपण आपल्या जवळच्या मित्र बरोबर हे एकदाही बोललेलो नसतो कि माझी अशी अशी fantacy आहे कि बाबा मला हा हा खेळ एकदा तरी खेळावासा वाटतो???... म कसले हे मित्र.. भले ते ४ एक वर्षांनी एकमेकांना भेटतात तरी इतके ते बदलेले असू शकतात ह्यावर माझा विश्वास नाही..

त्यातून प्रत्येकांनी खेळ सांगितल्यावर एक सारखी स्टोरी. उरलेल्या दोघान पैकी एकाला त्या perticular खेळाबद्दल फोबिया असतो.. म्हणजे ह्रितिक ला पाण्याची भीती, फरहान ला उंची ची भीती, अभय ला त्या बैलान मागे पाळण्याची भीती.. पहिल्या २ game ला instructor training देणार.. इतकी repetative story... का..??? झोया अशी का वागली..??? आणि ह्या adventure sports मधून मधून मसाला काय तर tomatino festival, सेनोरिता चा तो salsa का काय तो dance, एक tap dance etc... आवरा!!!

गाणी हि अशी बकवास कि एक लक्षात राहील तर शपथ.. ते एक सेनोरिता लक्षात रहात पण पहिल्या अंतऱ्या नंतर ते हि रेपेतातीवे वाटतं...

आता नवीन आलेल्या multiplex सिनेमा च्या मनानी खूप कमी कलाकार असूनही, group मध्ये कोणाही एकाचं वेगळे पण लक्षात राहत नाही.. (चूक सगळी दिग्दर्शिकेची..) group मध्ये एक मेकांच्या reaction खाल्ल्या जातात.. आपण एका कडे बघत असलो कि दुसरा काय expression देऊन गेला कळत ही नाही.. अरे काय नाटक आहे का..?? सिनेमा वेगवेगळे shots घेऊन प्रत्येकाच्या reactions capture करून edit करता येतो हे झोया विसरली कि काय.. आणि मुळात charactors वेगळे असूनही कोणीच असं वेगळा ठसत नाही.. (चूक सगळी संवादलेखकाची..) आणि त्या कलकी कोच्लीन ला हेरोईन कोणी केले यार.. ती का आहे..???

चित्रपटात anti climax, climax तंत्रचा वापर केलाय पण कुठलाच climax, climax वाटत नाही...

सुंदर दिसणारी कतरिना आणि नयनरम्य स्पेन ह्याच काय त्या चित्रपटाचा जमेच्या बाजू...

झोया plz पुढची फिल्म atleast आधीच्या फिल्म्स एवढी तरी चांगली असू देत..