रुक्साना.... काश्मीरच्या दूर्गम आणि आतंकवाद बाधित एका पाड्यावरची, १९ वर्षांची तरुणी... नववी पर्यंत शिकूनही आपल्या इथल्या अशिक्षित मुली पेक्षाहि जाणवण्या इतपत कमी आत्मविश्वास... साहजिक च आहे म्हणा, zero exposure... पण अश्या ह्या मुलीनी भल्या भल्यांना तोंडात बोटं घालायला लावणारा पराक्रम केला त्या विरांगने ची हि गोष्ट... २००९ सालच्या शेवटी शेवटी घडलेली...
काश्मीर मध्ये आतंकवादी आणि नागरिक गेले कित्येक वर्ष एकत्र राहतात... त्यातल्याच ३ अतिरेक्यांची वाईट नजर रूढार्थाने सुंदर नसलेल्या रुक्साना वर पडते.. निर्लज्जपणे ते तिच्या कडे तसा प्रस्ताव हि ठेवतात, रुक्साना त्यांना झिडकारून घरी येते आणि अपेक्षे प्रमाणे रुक्सानच घरा बाहेर पडणं मुश्कील होऊन जातं... (रुक्साना मुस्लीम म्हणून त्या अतिरेक्यांना काही कणव नसते... धर्म युद्धाच्या नवा खाली विकृती पोसणारे दानव हे) तरीही ती धीराने सामोरी जात असते.. एक दिवशी रात्री अतिरेकी सरळ तिच्या काकाच्या घरात दाखल होतात आणि धमकावून रुक्सानच घर दाखवायला सांगतात... जीवाच्या भयाने तोही मुकाट त्यांना रुक्सानाच्या घरी घेऊन येतो..
बंद दार उघडत नाहीत हे बघून, ते दार तोडून अतिरेकी रुक्सानाच्या घरात शिरतात... इकडे रुक्सानाच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकते... पण अल्ला कि मेहेरबानिसे रुक्सानाला बाजे खाली लपवण्यात तिची अम्मा यशस्वी होते...
आधीच वासनेने आणि रागाने आंधळे झालेले अतिरेकी ती दिसत नाही म्हणून वेडे पिसे होतात... तिच्या घरच्यांना मारपीट सुरु होते... रुक्साना तर त्यांना हवीच असते पण आता त्यांची अजून एक मागणी असते कि तिच्या धाकट्या भवानी अतिरेक्यांचा गटात सामील व्हावं...
त्यांच्या ह्या मागण्यांना रुक्सानाच्या घरचे बधत नाही म्हणाल्यावर त्यांच्या वर बंदूक उगारतात... बाजे खालून हे सगळं बघत असणाऱ्या रुक्सानाला अचानक काय प्रेरणा मिळते माहित नाही... बाजे खालीच पडलेली कुऱ्हाड उचलून रुक्साना बाहेर येते आणि एका अतिरेक्याच्या पाठीत सणसणीत वार करते... तो तिथल्या तिथे कोसळतो.. ह्या अनपेक्षित हल्ल्यांनी बावचाललेला दुसरा अतिरेकी तिच्या काकावर गोळी चालवतो.. हि बया त्याच्यावरही हल्ला चढवते आणि त्याला हि जखमी करते... तिचा हा अवतार बघून दोघे हि अतिरेकी पळून जातात...
आपल्याला बरं वाटतं.... गोष्टी चा सुखांत झाला... गोष्ट संपली... पण नाही गोष्टं अजून अर्धीच आहे... हे आपल्याला KBC (कौन बनेगा करोडपती) चा एपिसोडे पुढे गेल्यावर कळत... कारण एका special segment under रुक्सानाला KBC मध्ये बोलावलेला असतं... social responsibility म्हणून खूप स्तुत्य प्रयत्न...
अत्यंत बुजरेपणे, कावरी बावरी रुक्साना प्रवेश करते... तिला प्रश्नही सोपे विचारले जातात... आपल्याला काहीही न गमावता charity केल्याचे समाधान मिळतं... तिचा विषयी चा अभिमान कमी होऊ लागतो... आणि त्याची जागा तिच्या विषयी वाटणारी कीव घेते... आणि आपला ego मोठा होतो... (सोपे प्रश्न मुद्दाम दिलेत आणि हे माहित असूनही आपण show बघतोय, trp वाढवतोय म्हणजे उपकारच नाही का)
असो... मग अमिताभ बच्चन तिला विचारतो कि "५ करोड रुपये... क्या किजीयेगा इतने सारे पैसोन का" म ती सांगते कि "मुझे मेरे बच्चे के लिये घर बनाना हैं..." (आपल्याला आश्चर्य वाटतं कि ह्या पोरसवदा मुलीला मुलगा आहे?) आपलं social मन अजून हळहळत आणि ego अजून वाढतो...
होता होता ती एक लाख साठ हजार रुपये जिंकते... अमिताभ पुन्हा विचारतो, कि काय करणार या पैशांचं...? आणि मग ती जे उत्तर देते त्यांनी सणसणीत चपराक बसते आपल्याला... धाड्कन जमिनीवर येतो आपण... ती म्हणते "साठ हजार गरीबो मैं बाटूंगी और एक लाख मैं घर"...
च्या मारी... जेव्हा आमच्या कडे २ BHK घर होतं तेव्हा मोठं घर हवं होतं आता ४ BHK आहे तर interior करायचं.... charity तर माझ्या मनाला शिवतही नाही... आणि हि बाई जिच्या तान्ह्या बाळासाठी घर नाही ती स्वतःला मिळालेल्या अवघ्या १ लाख ६० हजारातले ६० हजार असेच देऊ करते...? (आणि हे आपल्याला माहित असतं कि हा काही publicity stunt नाही कारण सुदैवानी exposure च नसल्यानी ह्या गोष्टींचा तिला स्पर्श हि झलेला नाही... जे काही आहे ते निर्भेळ...)
इथेच हे सगळं थांबत नाही... अजून आपल्या लाजेची काही लक्तरं टांगायची बाकी असतात...
बोलता बोलता कळत ज्या अतिरेक्यांना हिने पळवून लावलेलं असतं त्यांनी फतवा काढलेला आहे (वर्तमान काळ मुद्दामून वापरलाय)... कि हिला जो कोणी त्यांच्या स्वाधीन करेल त्यांना ६ लाख रुपये मिळतील... (आहो आपल्याला हि रक्कम मोठी वाटते म कोण्या एका उपाशी खेड्यातला कोणालाहि हि रक्कम मोठी च आहे)
मग तिला अमिताभ म्हणतो तुला भीती नाही वाटत ह्या सगळ्याची...? तर पठ्ठी म्हणते "भ्यायचं का? जिस अल्ला ने उस वक़्त बाचाया वो अभी भी बचायेगा..."
अजून एक चपराक.... अरे देवा... एवढ्या तेवढ्या कारणाने देवावर रागावणारे आपण आणि इतक्या प्रतिकूल परिस्थितीत असूनहि देवावर अढळ विश्वास असणारी हि रुक्साना...
त्यापुढे जाऊन अमिताभ विचारतो कि नववी नंतर का शिकली नाहीस तर तिचं उत्तर असतं अतिरेक्यांनी शिकून दिलं नाही... मुली शाळेत निघाल्या कि त्यांना रस्त्यात अक्षरशः बदडून काढलं जायचं (दैत्यच ते...)
त्यापुढे जाऊन अमिताभ विचारतो कि नववी नंतर का शिकली नाहीस तर तिचं उत्तर असतं अतिरेक्यांनी शिकून दिलं नाही... मुली शाळेत निघाल्या कि त्यांना रस्त्यात अक्षरशः बदडून काढलं जायचं (दैत्यच ते...)
मग बोलता बोलता तिच्या नवऱ्याशी - कबीर शी आपली ओळख होते...हिच्या चेहऱ्या वरून हीचं बाल्य हि हटलेल नाही... आणि तिचा नवरा प्रौढ असा तिशी गाठलेला "माणूस"??? का बरं....?
मग कळत.... तिच्या protection साठी government नि police मध्ये काम करणाऱ्या कबीर ला नियुक्त केलेलं असतं... तो म्हणतो कि हिला जेव्हा बाहेर जायचं असायचं तेव्हा मी तिला जीप नि घेऊन जायचो आणि अतिरेकी आले कि सीट खाली लापावायचो... मी तिला सांगितलं होतं कि पहिली गोळी मी खाईन आणि मगच तुला काहीतरी होईल...
कबीर च्या protection खाली दिवस चालू असतात पण तिच्याशी कोणी लग्न करायाल तयार नसतो... कारण त्या फतव्यात हे हि लिहिलेला असतं कि जो कोणी हिच्याशी लग्न करेल उसके पुरे खानदान का खात्मा होगा...
ह्याही वेळी तिच्या मदतीला कबीर धावून येतो आणि स्वतःचेच नाही तर कुटुंबाचे प्राण धोक्यात असतानाही तो तिच्याशी निकाह करतो... (म्हणून एवढा मोठा नवरा) अजून एक चपराक... खाड...
पण लग्न झाल्यावर त्यांचा त्रास वाढतो.. अतिरेक्यानपायी त्यांना त्यांचे गाव सोडून पळून जावं लागतं... (म्हणून नसतं त्यांचं घर...)
आता मात्र आपण पूर्ण नामोहरम झालेलो असतो... आणि आपल्याला प्रश्न पडतो कि आयुष्य कोणाला कळलं हो...? उच्च विद्या विभूषित, AC office मध्ये बसून fb वर, किंवा ५ star हॉटेल मध्ये बसून चर्चा करणाऱ्या आपल्याला कि काश्मीरच्या एका दुर्गम खेड्यात राहणाऱ्या अर्धशिक्षित रुक्साना ला....???