"केल्याने होत आहे रे" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी – ८
Pic Credit: https://in.pinterest.com/pin/53902526767733330/ |
तर अश्या ह्या नीर्जल्याची ही गोष्ट. ऑस्ट्रेलीयाच्या
अॅडलेड शहराच्या आसपासच्या जंगलातली. ऑस्ट्रेलीया हा मुळातच बराचसा वाळवंटी प्रदेश.
त्यातूनही डिसेंबर ते फेब्रुवारी महीन्यातला उन्हाळा महाकठिण. तापमानाचा पारा सहज चाळीशी
ओलांडतो आणि वाळलेल्या शुष्क जंगलातून दरवर्षी नित्यनेमाने वणवा पेटतो. म्हणूनच
तिथले लोक उन्हाळ्याला ‘काळा उन्हाळा’ म्हणतात. पण २०१९च्या डिसेंबर महीन्यातला तो वणवा
शमण्याचं नावच घेत नव्हता. लाखो वर्ग किलोमीटरचा प्रदेश अग्नीच्या भक्षस्थानी पडला
होता. जंगलं तर वाचली नव्हतीच पण कित्येक छोटी-मोठी गावं, शहरं गीळत तो अग्नीचा तांडव चालला होता.
पुढचे बरेच दीवस असाच झाडं बदलत, झोप कमी करून अधिक सतर्क राहाण्याचं कौशल्य अंगीकारून तो वाचतो. पण वणवा काही शमण्याचं नाव घेत नसतो. कोरडी झाडं, सुकलेली पानं, अटलेले जल स्त्रोत असं विदारक दृश्य सगळीकडे असतं. अन्नावाचून अजून काही दिवस आपण जगू शकू, पण पाण्यावाचून अजून फार काळ तग धरता येणार नाही हे त्याला अगदी पक्क उमगतं. अत्यंत कमी पाणी पिऊन दिवस काढणा-या त्याला स्वतःच्या तहाने विषयी कदाचीत पहील्यांदाच इतक्या प्रकर्शाने जाणीव होत असते आणि त्याच बरोबर त्याला अजून एक जाणीव होते ती म्हणजे पाणी पिण्या साठी आता नवे कौशल्य आत्मसात करावे लागणार ही.
जंगलातले पाण्याचे सगळे स्त्रोत आटलेले असताना पाणी कसं मिळवावं ह्या
विचारात असतानाच तो बसलेल्या झाडाखाली जंगलातून जाणा-या रस्त्यावर काही सायकलस्वार त्याला दिसले. बारकाईनं निरिक्षण केल्यावर त्याला दिसलं की ह्या सायकल्स्वरांना दम लागला की
ते थांबतात आणि त्यांच्याकडे असलेल्या बाटलीतून पाणी पितात. आता त्यानी – एकलकोंडं
आयुष्य पसंत करणा-यानी – आपल्या स्वभावा विरुद्ध वागण्याचं कसब अंगीकारून माणसांकडूनच
मदत मागायचं ठरवलं. आधिच सुस्त असणा-या ह्या प्राण्यांना माणसाने शिकार करून, त्यांचा
आवास असणारी जंगलं कापून नामशेष प्रजातींच्या यादीत सामील करून टाकलय. तर अश्या आपल्या प्रजातीच्या –हासास कारणीभूत असणा-या माणसावर इतका सहज विश्वास टाकणं हे त्याच्या जनुकीय आठवणीला
पटत नव्हतं, पण त्याशिवाय त्याच्याकडे गत्यंतरही नव्हतं.
तो सावधपणे झाडावरून
खाली उतरतो आणि रस्त्याच्या कडेला येऊन बसतो. योगायोगाने तिथून काही सायकलस्वार जात
असतात. त्या निर्जल्याला रस्त्यावरून कुठल्यागाडी खाली येऊ नये म्हणून सुरक्षित स्थळी
हालवावं ह्या विचाराने ते सायकलस्वार त्याच्या जवळ थांबतात. हीच नामी संधी साधून तो
निर्जल्या अॅना नावाच्या एका स्त्री सायकलस्वाराकडे झपझप येतो आणि तीच्या सायकलवर
चढतो. त्याचा एकूण अवतार बघून त्याला तहान लागल्याचं संवेदनशील अॅनाच्या लगेच लक्षात येतं. स्वतःच्या पाण्याच्या बाटलीने ती त्या तहानलेल्या जीवाला पाणी पाजते. दुस-या सायकलस्वाराची पाण्याची बाटली संपवल्यावर कुठे त्या निर्जल्याची इतके दिवसांची तहान शमते आणि त्या नीरागस निर्जल्याच्या जनुकीय आठवणीत माणसाच्या संवेदनशीलतेची भर पडते आणि नवनवीन कौशल्य शिकून जीव वाचू शकतो ह्याची पण!
Pic Credit: https://images.app.goo.gl/9JXWHNvnRLPmsqhN8
तात्पर्यः १. कठीण
परीस्थीतीवर आपल्या कौसल्यांमधे वाढकरून मात करतायेते.
२. सखोल निरीक्षण आणि सतर्कतेने मोठ्या मोठ्या
समस्या सुटु शकतात.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment