Friday, January 24, 2020

"हे विश्वची माझे घर" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ४



हे विश्वची माझे घर



ही गोष्ट अजून काही वर्षांनंतरची – भविष्यकाळातील गोष्ट आहे.

गीरच्या जंगलात, सिंहांचं संवर्धन इतकं यशस्वी झालं की चौदाशे वर्ग किलोमिटरचं जंगल सिंहांना अपूरं पडू लागलं. सिंहांच्या टोळ्या एकमेकांच्या क्षेत्रांवर ताबा सांगू लागल्या. त्यातून टोळीयुद्धाला सुरुवात होऊ लागली. सिंहांची संख्या खूप वाढल्यामुळे पुरेश्या शिकारी मिळणं कठीण होऊ लागलं. एकुणातच गीरच्या जंगलात अनागोंदी माजायला लागली.

Pic Credit: https://images.app.goo.gl/GpdU9dxoekju2BaP7

यातून बाहेर पडलं नाही तर सततची टोळी युद्ध, अशांती, भुकमरी हे अटळ आहे हे गीरकेसरी कुटुंबाच्या तरुण सिंहाला कळलं होतं. गीरच्या दक्षिणेला, सह्याद्री पर्वताच्या जंगलां मधून बिबटे आणि तुरळक वाघ सोडले तर मार्जारवंशीय फारसे मोठे प्राणी नाहीत ही पक्की माहीती त्यानी काढली होती. कितीही, हवी हवीशी, प्रीय असली तरी आपल्या जन्म भूमीत आपला निभाव लागणार नाही, आपल्याला किंमत राहाणार नाही हे जर वाटत असेल तर आपले प्रीयजन सोडून नवी भूमी आपली कर्मभूमी करावी लागणार हे समजण्या इतका तो प्रगल्भ होता.

सगळ्या कुटुंबाचा निरोप घेउन तो निघाला. त्याला वाटलं तेवढं निरोप घेणं सोपं नव्हतं. त्याच्या बायकापोरांनी, मित्र-आप्तेष्टांनी त्याला जाण्या पासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. पण ह्या कुठल्याही मोहात न अडकता तो निघाला. संह्याद्रीच्या जंगलात मोठे मार्जार फारसे नाहीत कारण माणसाने ते शिल्लक ठेवले नाहीत अशी त्याला भितीही घालून झाली पण तरीही तो निघाला. इतकाच विचार करून की ‘मरण इकडेही आहे आणि कदाचीत तिकडेही. पण म्हणून कुठलेही प्रयत्न न करता हातावर हात धरून बसणं हा निव्वळ मुर्खपणा आहे. जेव्हा तिकडे आपलं बस्तान उत्तम बसेल, तेव्हाच सगळ्यांना आपलं म्हणणं पटेल’ हा त्याला सार्थ विश्वास होता.


Pic Credit: https://images.app.goo.gl/dNAs8gyP2C1mQxPw8

तो निघाला खरा, पण त्याच्या प्रत्येक पावलावर नवीन नवीन संकटं आ वासून उभी होती. एका जंगलातून दुस-या जंगलात जाणारे वन मार्ग माणसाने शिल्लक ठेवले नव्हते. त्यामुळे दिवसा ढवळ्या माणसाच्या नजरेस पडणार नाही असं गावाच्या बाहेर झाडीत, टेकडीवर लपून राहायचं आणि रात्रीच्या अंधारात, ओस पडलेल्या रस्त्यांवरून मार्गाक्रमण करत राहायचं. कित्येक दिवस असेही जायचे की शिकार ही मिळायची नाही तरी चालत राहाणं आणि गावं ओलांडणं भाग होतं. बरं, गावातले रस्ते सहसा रात्री ओस असत पण दोन गावांना जोडणा-या महामार्गांवर, वेगवान वाहानांची सततची वर्दळ. उभं आयुष्य जंगलात काढलेल्या त्या तरुण सिंहाला त्या वाहानांनी पार धडकी भरायची. त्या वाहानांचे डोळे दिपवणारे प्रखर दिवे, कर्णकर्कश्य भोंगे आणि भरीस भर म्हणून जीवघेणा वेग. दोन-तीन वेळा तर मोठ्या मोठ्या वाहानांना धडक होऊन मरता मरता तो वाचला. धडक झालीच, किंवा गाडी समोर आलीच तर जवळच्या झाडीत तो धूम ठोकत असे. कारण माणसांनी पाहीलं तर भितीच्या नावा खाली ते काय करतील याचा काही नेम नाही.

Pic Credit: https://images.app.goo.gl/avNuL4LFR1dqYErk8

पण सरते शेवटी मजल दरमजल करत तो सह्याद्रीच्या कुशीत पोचला. एक मोठा टप्पा पार पडला खरा पण संकटं काही संपायचं नाव घेत नव्हती. गीरच्या मुख्यत्वे सपाट जंगालां ऐवजी, सह्याद्रीची ऊंच सखल जमिन. ह्या पर्वतीय प्रदेशात शिकार दिसणं आणि मग ती करणं हे ये-यागबाळ्याचं काम नव्हतं. सपाट जंगलामधे शिकार करायला रुळलेलं शरीर डोंगरावर शिकार करायला साथ देत नव्हतं. कित्येक वेळा आपण येऊन चूक केली का असं त्याला वाटे. आपल्या परीवाराच्या, मित्रांच्या आठवणीने जीव अगदी काकूळतीला येई. इथे येण्याच्या निर्णयाचा पश्चाताप होई. सगळं सोडून परत आपल्या जंगलात, आपल्या कुटुंबाकडे परत जाण्याचा विचार येई. एकटेपणा, उपासमार, अवघड भूक्षेत्र सगळेच  त्याची परीक्षा पाहात होते.

Pic Credit: https://images.app.goo.gl/ecUwGvTySRQ5zB6w9

पण मग तो स्वताःला समजावे, 'आपल्या गीरच्या जंगलात होणा-या त्रासा पासून वाचायला इथे आलो ना. इथे शिकार करणं अवघड नक्की आहे, पण शिकारीयोग्य प्राणी भरपूर आहेत. जमीन वावरायला सोपी नाही पण दूर दूर पर्यंत गीरसारखी सिंहाची किंवा इतर मोठ्या मार्जारवंशीयांची गर्दीही नाही. एकुणात इथे बस्तान बसवणं अवघड आहे; पण एकदा का ते जमलं की आपणच ह्या जंगलाचे राजे होणार!'

आणि त्या दृष्टीने त्यानी प्रयत्न सुरु केले. आधी ते जंगल पालथं घातलं त्यानी, तिथे काय काय आहे, कसं, कुठे कोण प्राणी आहेत, त्यांच्या जमेच्या बाजू कुठल्या आणि कमकुवत बाजु कुठल्या, आपल्या कुठल्या, आपल्याला कशात काय बदल करावा लागेल, काय सुधारणा स्वतःत करावी लागेल. ह्या सगळ्यावर बारकाईने आभ्यास करून तो एक एक पाऊल टाकू लागला, वाढु लागला. हळू हळू, आपल्या ह्या सह्यकेसरीची जंगलात दहशत पसरू लागली आणि थोड्याच दिवसात तो त्या सह्याद्रीच्या जंगलाचा अनभिषिक्त सम्राट झाला.



त्यानंतर त्यानी त्याचं सबंध कुटुंब सह्याद्रीच्या त्या जंगलात आणलं. सुरुवातीला सगळ्यांना नविन जागेशी जुळवुन घेणं अवघड गेलं, पण कोणीच ताकदीचा प्रतीस्पर्धी नसलेल्या त्या जंगलात त्यांचं कुटुंब सुखानी राहू लागलं. त्यांना जरी ह्या त्रासातून जावं लागलं असलं तरी त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित केल्याचं समाधान त्यांना झालं. गीरची आठवण होते त्यांना अधून मधून पण ह्या नविन जंगलाशीही त्यांचं घट्ट नातं तयार झालय! आणि पुढच्या पिढी साठी संह्याद्रीचं हे उंच सखल जंगलच त्यांचं मुळ घर झालय.

Pic Credit: https://images.app.goo.gl/hLjr5Yeuaa88V5yo8

सिंहांच्या ह्या धाडशी संक्रमणानी एक मात्र व्हावं, वेगवेगळी जंगलं जोडणारे वनमार्ग राखण्याचं मनुष्यप्राण्यानी मनावर घ्यावं!

तात्पर्यः १. चांगली किंवा वाईट परिस्थिती ही सद्य स्थितीत सुधारणा करण्याची एक संधीच असते.
२. स्वतःवर विश्वास ठेऊन प्रतीकुल प्रदेशात सुधारणा शक्य नसेल तर तिथुन बाहेर पडून नविन प्रदेश अनुकुल बनवता येऊ शकतो.
३. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कठिणातील कठिण परिस्थीतीवर मात करता येते.
४. कुटुंब, मित्र बरोबर नसतील तर मोठ्यातला मोठा विजयही अर्थहीन ठरतो.

Thursday, January 16, 2020

"तू साद दे" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ३

डिस्कव्हरी वाहीनीवर प्रसारीत झालेल्या माहीतीपटावर आधारीत.



तू साद दे


Pic Credit: https://images.app.goo.gl/R3GoZQa7RgXa4tMfA

गुजराथच्या गीर अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रातली ही गोष्ट. आशियायी सिंहांचं हे एकमेव वस्ती स्थान. अभयारण्याच्या मुख्यक्षेत्राला वेढून असलेलं जंगल आणि तुरळक मनुष्यवस्तीचं बेमालूम मिश्रण म्हणजे हे संरक्षित क्षेत्र.

Pic Credit: http://www.conservingcentralindia.org/uploads/1/8/1/8/18187127/published/handbook-1.jpg?1522696260

अभयारण्याच्या मुख्यक्षेत्रात तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढली की अन्नाच्या शोधात तिथले प्राणी बाहेर येऊ लागतात. मनुष्यवस्तीतील शेतं ही त्या बाहेर आलेल्या हरणं, सांभार, गव्यांसाठी नवी कुरणं होतात आणि त्यांचा माग घेत घेत जंगलातले मांसभक्षीही तिथे शिकारीसाठी वास्तव्य करू लागतात. हे सगळं माणसाच्या नजरेआड आणि मग कधी कधी माणसाच्या नजरे समोर वर्षानुवर्ष चालत असतं.

Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRkiJtCQ-bdibNZGY5rTjK2MvwsbLfbSX5AY1flEVpveUWO6Zqo-w&s

आपलं गीरचं जंगलही त्याला काही अपवाद नव्हतं. जंगलातल्या हरणांना १२ महीने शेतात मिळणा-या मेजवानीचा सुगावा लागला होता. शेतातली माणसं दिवस ढळल्यावर घराकडे परतत हे ही त्या हरणांनी हेरून ठेवलं होतं. त्यामुळे रात्र झाल्यावर ते शेतात शिरत आणि पिकांचा फडशा पाडत.

गावातल्या लोकांनाही ह्याची चाहूल लागली होती आणि म्हणून ते ही शेतावर आळीपाळीनी गस्त घालात. हरणं शेतात घुसली की गस्तीवरची माणसं हाळी देऊन बाकीच्यांना जागं करत आणि मग सगळे मिळून आटापिटा करून त्या हरणांच्या झुंडीला पळवून लावायचा प्रयत्न करत. रोजचाच हा जणू खेळ झाला होता आणि हे गावकरी त्या हरणांना चांगलेच कंटाळले होते.

Pic Credit: https://images.app.goo.gl/AgFfwcks7yVEx6Jh7

गावाजवळच्या एका टेकडीवरून स्वतःच्या कळपातून सिंहाच्या रीतीप्रमाणे नुकताच बाहेर निघालेला एक तरुण सिंह बरेच दिवस हा सगळा प्रकार बघत होता. त्यला कळून चुकलं होतं की गस्तीवरच्या माणसांनी हाळी दिली ह्याचा अर्थ हरणं शेतात शिरलीयत. जुन्या कळपातून आलेल्या शिकारीच्या अनुभवावरून त्यानी हे ही ओळखलं होतं की हरणं जेव्हा ओळखीच्या परीसरात नसतात तेव्हा अधिक भेदरलेली असतात. शेत आणि पुढे मानवी वस्ती असल्याने, पळून जायला, लपून राहायलाही फारशी जागा नसते आणि त्यामुळे सहज शिकार बनू शकतात.

Pic Credit: https://images.app.goo.gl/K6EkRwVk7Gfpr4pX8

प्रश्ण फक्त एवढाच होता की भर वस्तीत माणसाच्या इतक्या जवळ जाणं ह्यात मोठा धोका होता. कारण माणसाचा काही भरवसा नाही. माणसा इतका मायाळू आणि माणसा इतका क्रूर जगात दुसरा प्राणी नाही. हाळी ऐकून आपण हरणांची शिकार करायला जायचं आणि तेव्हढ्यात गावातली बाकीची माणसं आली तर हरणं सोडून ती आपल्याच मागे लागायची आणि आपला नाहक बळी जायचा अशी त्या तरूण केसरीची रास्त भिती होती.

पण त्याला इतकी सहज शिकार सोडून देणं हे मुर्ख पणाचं आहे हे ही कळत होतं. आणि त्यच्या डोक्यात एक कल्पना सुचाली. धोका पत्करायचा पण मोजुनमापून आणि नियोजनपुर्वक.

रोज रात्री टेकडी ऐवजी शेताजवळच्या झाडीत कोणाला दिसणार नाही असं लपून राहायचं. म्हणजे हळी ऐकून टेकडी उतरून येण्याचा वेळ वाचेल. माणसाची हाळी आली की तत्क्षणी सर्वात जवळचं सावज हेरून शिकार करायची आणि गावातली माणसं यायच्या आत शिकार घेउन झाडीत गायब व्हायचं.

Pic Credit: https://images.app.goo.gl/NTpDa6ib4tBXrNY78

ह्या नियोजनबद्ध आणि मोजका धोका पत्करण्याचा त्याला फायदाही होऊ लागला. फारसे कष्ट न घेता त्याला शिकार मिळू लागली. त्यानी ही मोठ्या दिलदार मनानी त्याची ही युक्ती त्याच्या इतर तरूण, कळपातून नुकत्याच बाहेर पडलेल्या मित्रांना सांगितली. बघता बघता शेतावरच्या हरणांची शिकार करणारी सिहांची टोळीच तयार झाली.

आता हाळी वाजली की सिंह यायचे, शिकार करायचे त्यांना शिकार करताना बघून बाकी हरणं जंगलात पळून जायची. गावातून जागी होऊन माणसं यायच्या आत शेत मोकळं!

Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRbjP7sWIdXhs_nvJeu-8aVbLIl4jMjExVeCE0HJi3RvJeL_luFxw&s

काही हुशार गावक-यांना हा सगळा प्रकार कळून चुकला. सिंहांना घाबरण्याची नाही तर उलट त्यांना बोलावण्याची गरज आहे हे त्यांना उमगलं. शेतात हरणं शिरली की गावातून कोणी यायची गरज नाही की आटापिटा करून हरणांना हुसकावण्याची ही गरज नाही. एक हाळी मारायची, सिहांना बोलवायचं आणि स्वस्थ बसायचं. एकमेकांना मदत करून जीवन कीती सोपं होतं!

Pic Credit: https://images.app.goo.gl/aSnEDP87Q5LCc1aN9

सिंह आणि माणसाची अशी दोस्ती झाल्याचं दुसरं कुठलं उदाहरण नसेल! आणि भोळ्या हरणांना त्यांच्या ह्या योजनेचा सुगावा लागे पर्यंत तरी ही दोस्ती अशीच अबाधित राहील.

तात्पर्यः १. बारकाईनं निरिक्षण केलं तर मोठे मोठे प्रश्ण सहज सुटतात.
      २. मोजकाच पण नियोजनपुर्वक पत्करलेला धोका चांगलीच फळं देतो.
      ३. इतरांना केलेल्या मदतीचा तुम्हालाही फायदा होतो.
      ४. माणुस आणि प्राणी गुण्या गोविंदानी राहू शकतात.

_______________________________________________________________________

"नाही म्हणजे नाहीच!" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ५
"घे भरारी" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ६

Saturday, January 4, 2020

"मन धागा धागा जोडते" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - २

मन धागा धागा जोडते

Pic Credit: https://images.app.goo.gl/qYubKW119YBES2u5A



आसामच्या दूरवर पसरलेल्या काझीरंगा जंगलातली ही गोष्ट. ब्रम्हपुत्र नदाच्या आणि गजगवताच्या मधल्या कुरणांवर एकशिंगी गेंड्यांचं एक कुटुंब राहात असे. एक धष्टपुष्ट नर गेंडा, त्याची बायको आणि त्यांचा एक गुबगुबीत अवखळ बछडा.



ब्रह्मपुत्र नदाचं पात्र इतकं विशाल की एका किना-यावरून दुसरा किनारा दिसत नाही. म्हणूनच हा ब्रह्मपुत्र नद म्हणवला जातो ब्रह्मपुत्रा नदी नाही. आणि हत्ती एवढ्ं उंच वाढणारं गवत म्हणून ते गजगवत.

तर एकाबाजुला मैलोंमैल पसरलेलं नदाचं पात्रं आणि दुस-या बाजुला निबिड असं गवताचं जंगल त्यामुळे हे आपलं गेंड्याचं कुटुंबं बाकीच्या जंगलापासून तसं वेगळंच असायचं. खायला प्यायलाही मुबलक होतं त्यामुळे कुठे जायची ही गरज नव्हती. गेंड्याच्या बछड्यानी तर इतर कुठले प्राणीही फारसे कधी पाहीले नसावेत.



Pic Credit: https://images.app.goo.gl/QxunmmXtYWKUxWt97

आपला नर गेंडामात्र सकाळ झाली की त्यांच्या कुरणावर गस्त घालायला निघायचा आणि सुर्यास्ता वेळी त्याच्या कुटुंबाकडे परतायचा. येताना बच्चू गेंड्यासाठी कधी दूरवरून कोवळं कोवळं गवत आणायचा, तर कधी सुवासिक मऊ लुसलिशित फुलं खायला आणायचा तर कधी गोड गोड रसाळ फळं आणायचा. त्यामुळे आपला बच्चू गेंडा त्याच्या बाबाची अगदी आतुरतेने वाट बघायचा. रात्र झाली, कुरणांवर थंडीची घट्ट दुलई पसरली की बाबा गेंड्याच्या उबदार कुशित आपला बच्चू गेंडा गाढ झोपी जाई.

एक दिवस असाच बाबा गेंडा गस्त घालायला गेला आणि सुर्यास्त झाला, रात्र झाली, तरी परत आलाच नाही. आपला बच्चू वाट बघून बघून, रडून, दमून थकून झोपून गेला. दुस-या दिवशिही जेव्हा बाबा परत आला नाही, तेव्हा मात्र आपल्या बच्चूनं ठरवलं की आपणच बाबाला शोधायला निघायचं.

त्याच्या आईला घेऊन तो निघाला तिन चार दिवस फिरून त्यांनी त्यांचं अख्ख कुरण पालथं घातलं तरी त्याला बाबा मिळाला नाही. निराश होऊन ते त्यांच्या नेहमीच्या जागी परतणार तोच त्यांना गजगवतात निपचीत पडलेलं बाबा गेंड्याचं शव दिसलं. शव होतं खरं, पण बाबा गेंड्याचं सुडौल, ऐटदार शिंग मात्र गायब होतं.

Pic Credit: https://images.app.goo.gl/DCByhtg1w258ddNn8


बच्चूच्या आईला काय समजायचं ते समजलं. बच्चूनं पुन्हा पुन्हा आग्रह, हट्ट केल्यावर आईनी त्याला सांगितलं, “अरे, आपल्या गेंड्यांच्या शिंगाना अंतरराष्ट्रीय बाजारात खूप किंमत आहे. चिन देशात तर आपल्या शिंगांचा पारंपारीक औषधात उपयोग करतात आणि म्हणूनच तस्करांनी, तुझ्या बाबांची अशी शिकार केली. आपल्या आसपास शिका-यांचा वावर आहे हे वेळीच आपल्याला कळलं असतं तर कदाचीत आपण सुरक्षित स्थळी गेलो असतो आणि बाबा वाचले असते” असं म्हणून आई धाय मोकलून रडायला लागली.

Pic Credit: https://images.app.goo.gl/KapN38c1ytWP8wBa7

स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचाही बळी घेण्यास तयार होणा-या, कुठलाही विचार न करता दुस-यांना दुःख देणा-या त्या वृत्तीची बच्चूला किळस आली. मात्र पुढच्याच क्षणात तो मोठा झाला. आईला चाटून चाटून शांत करू लागला पण त्याच्या डोक्यात मात्र विचारांनी थैमान घातलं होतं. ‘आज हे बाबा बाबतीत झालं, उद्या माझ्या किंवा आईच्या बाबतीत हे होऊ शकतं. हे थांबायला पाहीजे. आई म्हणतीय तशी शिका-यांची माहीती आपल्याला मिळालीच पाहीजे. आपल्याला ओळख वाढवली पाहीजे. इतर गेंड्यांशीच नव्हे तर जंगलातल्या जास्तीत जास्त प्राण्यांशी. कोणी ना कोणी तरी त्या शिका-यांना जंगलात येताना, सापळा रचताना, शिकारीवर पाळत ठेवताना बघेल आणि आपल्याला येऊन सांगेल.’ आपण ओळखच नाही केली, ठेवली, वाढवली तर ही माहीती मिळणं केवळ अशक्य आहे हे त्यानी अगदी मनोमन ओळखलं.

ओळख वाढवायची खरी, पण खरा प्रश्ण तर पुढेच होता की कशी?

आधी आधी तो दुस-या प्राण्या समोर जाई पण मग शरमेने, भिडस्तपणाने काहीच न बोलता निघून येई, आई बाबांच्या सावलीतून कधीच बाहेर न पडलेल्या त्याला हे सगळं खूप नवीन आणि अवघड होतं. पण त्याची जिद्दही प्रचंड होती.

मग हळू ह्ळू तो दुस-या प्राण्या समोर जाऊन हसू लागला, नमस्कार म्हणू लागला, शिळोप्याच्या, हवापाण्याच्या गप्पा मारू लागला. ओळख होत होती.

जंगलात फिरताना एखाद्या ओळखीच्या प्राण्याच्या भागातून जात असला तर थोडी वाट वाकडी करून मुद्दाम त्या प्राण्याला भेटून येई – अर्थात त्याच्या वेळ पाहून. कुठल्याही कामा शिवाय, अपेक्षे शिवाय तो हे करत होता. तो ओळख ठेवत होता.

Pic Credit: https://images.app.goo.gl/F3K9dvoNgeoDVhBm7

एक दोन भेटीत त्याला समोरच्या प्राण्याच्या आवडी निवडी कळू लागल्या मग तो त्या अनुषंगानी त्यांच्याशी बोलू लागला, त्यांना आवडणा-या विषयाची अधिकाधिक माहीती करून घेऊ लागला, त्या प्राण्यांना ती माहीती नसेल तर ती देऊ लागला, सहज शक्य असल्यास त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना भेट देऊ लागला. अगदी निरपेक्ष भावाने. तो ओळख वाढवत होता.

आता त्याची ओळख त्याच्या एवढ्या, त्याच्या पेक्षा छोट्या, मोठ्या सगळ्या प्राण्यांशी, पक्षांशी झाली होती. इतकच काय, प्रत्येक गेंडा सवयीनं एकाच ठिकाणी मैला विसर्जन करतो, त्या लीद मधे काही किडे आपलं जिवन व्यतीत करतात. त्या किड्यांशीही तो मायेने पण आपला आणि त्यांचा आब राखून बोलत असे.

त्याला कधी शिकारी दिसले तर तो ईतरांना सावध करी. बोलता बोलता तो इतर प्राण्यांनाही असं करण्याची विनंती करे. आणि सगळ्यांच्या आवडत्या बच्चूची विनंती कोण ऐकणार नाही? जंगलात काही खुट्ट जरी वाजलं तरी त्याला कळू लागलं, शिकारी यायच्या आधिच आईला ईतर मित्रांना सुरक्षित स्थळी घेऊन जाता येऊ लागलं.

बघता बघता त्याच्या ओळखी खूप वाढल्या आणि त्याचा फायदा त्याला शिका-यांपासून वाचायला तर झालाच पण त्या शिवाय त्याला कोवळं लुसलिशित गवत कुठे आहे, रसदार फळं कुठे आहेत हे ही कळू लागलं. दर पावसाळ्यात ब्रह्मपुत्रला येणा-या संभाव्य पुराची नदीच्या उत्तर तटावर राहाणा-या प्राण्यांकडून पुर्व सुचना मिळू लागली. त्यातून सगळ्यांना वाचवता येऊ लागले. साध्या एका ओळख ठेवण्याच्या, वाढवण्याच्या सवयीनी इतका फायदा होईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं!

एकुणात आपला बच्चू सुखानं काझीरंगात विहरू लागला!

Pic Credit: https://images.app.goo.gl/fkRXjjdqzUV9jdcPA


तात्पर्यः १. होऊन गेलेल्या घटनांचं दुखः करत बसण्यात काहीच हाशिल नाही.
       २. पुर्ण मनापासून, जिद्दीनं केलेल्या कामात यश मिळतच.
      २. आपण शक्य ती मदत निरपेक्षपणे करत जावी. कधी ना कधी त्याचा नक्कीच आपल्याला           फायदा होतो.
      ३. ओळख जपणे, वाढवणे हे ज्याला जमतं त्याचं आयुष्य खूप सुखकर होतं

_______________________________________________________________________


Saturday, December 14, 2019

"पुर्णमिदं स्वरूपं" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - १


माझ्या पावणे तीन वर्षांच्या मुलाला झोपवताना सुचलेली ही गोष्टं. पण मोठ्यांनाही रुचेल अशी.

पुर्णमिदं स्वरूपं
(हे स्वरूप संपुर्ण आहे)


Pic credit: https://www.dreamstime.com/lush-dense-green-forest-sun-rays-touching-plants-trees-highly-detailed-vector-illustration-sun-rays-shining-image120234740


कोण्या एके काळची ही गोष्ट आहे, एक घनदाट जंगल होतं. गोष्ट कोण्या एका काळचीच आहे. कारण जंगल खरच खूप घनदाट होतं! इतकं की त्या जंगलात बरेच वाघ; आणि सिंहांचे काही कळप सुखाने नांदत होते. वाघ एकटे एकटे राहून शिकार करत तर सिंह कळपात राहून शिकार करत.

एके दिवशी, केवळ योगा योग म्हणा किंवा काही, एक ढाण्या वाघ आणि सोन सिंहांचा एक कळप शेजारी शेजारी राहु लागले.

ढाण्या वाघ रोज सिंहाना कळपात शिकार करताना बघायचा. सगळे सिंह मिळून अगदी सहज मोठे मोठे गवे, वयात येत असलेले हत्ती शिकारीत मिळवत असत आणि मग एकदा शिकार केली की पुढचे काही दिवस त्यांना परत शिकार करायची गरज नसे.

Pic credit: https://www.microsoft.com/en-us/p/lion-family-sim-online/9pn8vdt79gkj#activetab=pivot:overviewtab

पण वाघाचं तसं नव्हतं. त्याला एकट्यालाच शिकार करावी लागे आणि त्यामुळे हरणं, रानडुक्कर अशा छोट्या शिकारी पकडून त्याला समाधान मानवे लागे. परत शिकार छोटी असल्याने वारंवार शिकार करावी लागे. तो ह्या घोर मेहनतीला पार कंटाळून गेला होता.

Pic credit: https://www.microsoft.com/en-us/p/wild-tiger-jungle-hunt-african-animal-hunting/9nblggh1nht3#activetab=pivot:overviewtab

काही दिवसांनी वाघाला वाटायला लागतं की ह्या सिहांना किती आराम आहे. आपल्या सारखी रोज रोज मेहनतही करावी लागत नाही, शिकारीची जबाबदारीही एकट्यावर नाही. आरामात चालू आहे त्यांचं. मग तो ठरवतो. आपणही सिहांसारखा कळप करून राहायचं आणि जो पर्यंत आपला वाघांचा कळप होत नाही तोपर्यंत शिकारच नाही करायची! हे आळशी सिंह जर ते करू शकतात तर आपण तर नक्कीच करू शकू.

झालं. आता हा आपला ढाण्या वाघ कळप जमवण्या साठी ईतर वाघ शोधत फिरू लागतो. बरेचसे वाघ त्याला वेड्यात काढतात. काही काही वाघ तर त्या ढाण्या वाघाला आपल्या हद्दीत घुसलेलं पाहून त्याच्यावर हल्ला चढवतात.

Pic credit: https://www.trademe.co.nz/home-living/home-d%c3%a9cor/posters/other/listing-2440681048.htm

बघता बघता असे दिवस गेले, आठवडे सरले, पण आपला ढाण्या वाघही फार जिद्दीचा. त्यानी काही चिकाटी सोडली नाही. आणि सरते शेवटी एक एक करत करत वाघ त्याच्या आमिषाला बळी पडत कळपात सामिल व्हायला लागतात. सगळ्यांनी एकच ठरवलेलं असतं. आता सिहां सारखं कळप जमल्याशिवाय शिकार करायची नाही. आणि एकदा का कळप जमला की आरामात शिकार करायची.

सरतेशेवटी, ७ – ८ वाघांचा कळप जमतो. आणि ते सगळे शिकारी करू लागता. कोणी दबा धरून बसे, तर कोणी मधेच पुढे निघून जाई, कोणी एक सावज हेरे तर कुणी दुस-याच सावजावर हल्ला चढवी. त्यांच्यात काही केल्या काही ताळमेळ बसेना. असेच बरेच दिवस चालू होते. पण जस जसे दिवस सरत होते तस तसे पोटात काहीच अन्न न गेल्यामुळे ते सगळे वाघ अतिशय अतिशय क्षीण, दुबळे होत चालले होते. इतके क्षीण की आता एकट्यानेही शिकार करायची ताकद त्यांच्यात उरली नाव्हती.

Pic Credit: https://www.gograph.com/clipart/deforestation-scene-with-weak-tigers-gg118862497.html

सोन सिंहांच्या कळपाचा राजा त्या वाघांची ही गंमत पाहात होता. आणि एक दिवशी न राहावून तो त्या वाघांना भेटायला गेला.

त्यांना तो म्हणाला, “नमस्कार शेजा-यांनो. गेले कित्येक दिवस मी तुमची कसरत बघतोय. पण असं बघा, तुम्ही वाघ आहात आणि आम्ही सिहं आहोत. परमेश्वरानं म्हाणा, निसर्गानी म्हणा आपली रचनाच वेगवेगळी केलीय. जसं ठरवूनही आम्ही एकटे एकटे शिकार करू नाही शकणार तसच ठरवूनही तुम्ही ही आमच्या सारखी कळपात शिकार नाही करू शकणार. मुळात तशी गरजही नाहीये. आपलं मेंदू, शरीर, मन सगळं सगळं आपापल्या शिकार पद्धतीला साजेसं बनवलय. त्याची किंमत नको का आपणच करायला?

तुम्हाला वाटतं खरं, की आमचं सगळं आरामात चालू आहे. पण आम्हाला आमच्या कळपाला पुरेल एवढी मोठी शिकार नाही मिळाली तर, उपाशीच झोपावं लागतं. आमच्या पेक्षा थोरा मोठ्यांचं ऐकावच लागतं. आम्ही तुमच्या सारखे स्वतःच्या मनाचे राजे नाही आणि तुमच्या सारख्या छोट्या छोट्या शिकारी करून आमचं भागणारही नाही. पण म्हणून काय आम्ही स्वतःला कमी लेखून घ्यायचं? मुळीच नाही!

आपल्याला एकमेकां सारखं बनण्याची गरज नाहीये. आम्ही जसे आहोत तसे स्वयंपुर्ण आहोत. आणि तुम्ही जसे आहात तसे तुम्ही स्वयंपुर्ण आहात. त्यामुळे असं आंधळेपणाने कोणासारखं बनण्याचे प्रयत्न सोडा आणि स्वतःची खरी ताकद, खरी किंमत ओळखा.”

Pic credit: https://www.dailymotion.com/video/x2wv0qt

सोन सिंहाचं म्हणणं सगळ्या वाघांना मना पासून पटतं. तो पुढे म्हणतो, “तुम्ही आमचे शेजारी. तेव्हा तुमच्या अडचणीच्या काळी तुम्हाला मदत करणं आमचं कर्तव्य आहे. तेव्हा आम्ही सगळे सोन सिंह मिळून तुमच्या साठी एक मोSSठी शिकार आणून देतो. खूप महीन्यात तुम्ही काही खाल्लेलं नाही. उपाशि असाल. पोटभर खाऊन घ्या आणि आपापल्या मार्गानी जा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि होतात तसे आनंदानी राहायला लागा”.

त्यानंतर मात्र वाघांनी असा वेडेपणा केल्याचं ऐकीवात नाही!

तात्पर्यः १. स्वतःवर विश्वास ठेवा.
      २. सारासार विचार केल्याशिवाय आंधळेपणाने कुठलीही कृती करू नका.

Monday, September 23, 2019

धग...




खुप दिवसात असं लिहिलंच नाही काही
खोल मनातलं बाहेर दाटुन आलं नाही

खुपण्याची, दुखण्याची, अडण्याची, पडण्याची
भुतंच होऊन गेली होती सवईची

आपलं आपण असण्याची / नसण्याची
गरजच काय कोणाला काही सांगण्याची?

त्यांचं त्यांचं चालू असतं, तुमचं तुमचं चालू असतं
आणि त्यातून मुळात, तुमचं कोणाला ऐकायचं असतं?

सोडून जेव्हा दिले होते व्यक्त होण्याचे खेळ
आजच अशी अचानक ही कुठली आलीय वेळ?

झरे बिरे जाणीवेचे जरी आटून गेले पाठी
कवितेच्या अश्या ओळी तरी कुठुन आल्या ओठी!!

जागं होतय सारं की नव्यानी जन्मतय काही
धग ही चैत्यन्याची देवा, चेतवत राहो पाही...
देवा चेतवत राहो पाही...

Friday, August 31, 2018

Neelangi - almost dead female infant


Based on a true incident of female infant deaths in India:

THAT MORNING

It was a bone chilling winter dawn in the interiors of Punjab. Everything would be quite except the sweet little chirping of early risers and a shrill cry of despair she had planned...

But when she looked at the 3rd bundle of sorrow she had given birth to last night, still moving, a mother in her won over a helpless woman in her. She lifted her baby and embraced her in a warm tight hug and then drenched her with uncontrolled tears flowing down her eyes in absolute silence. The bond of a mother and baby was established.
ONE MONTH BEFORE

Everything wasn't good in the house of Bhatti's as Mandeep - a mother of two - was due in a months time. Mandeep and Sajjansingh were parents to two bubbly girls and Sajjansingh was very clear that this time he wants to have a son or none. 

While Mandeep was leaving to her brother's house for delivery, Sajjansingh made it clear in no uncertain terms that 'he can take care of no more than two girls and she need not return if she gives birth to a baby girl'. No pleading, no sobbing from her persuaded him to change his brutal stance.

Mandeep came to her brother's house under this tremendous pressure of losing her husband and the security which comes with it. Her elder brother - Kartarsingh - assured her that if Mandeep gives birth to a girl, he will speak with Sajjansingh and will convince him to forget the bitterness and accept you. Mandeep was so proud to have a brother like him!

Mandeep - now bit relaxed - delivered a baby in nearby hospital and as was expected - it was a baby girl. There were no smiles, no congratulations, no 'Wai guru da khalasa, wai guru di fateh', there was no celebration. Mourning was the only emotion with which that little angel was welcomed in this world. 

Now all the hopes were on Kartarsingh. Mandeep was sure, that her brother will convince her husband and will save her marriage.  

But Kartarsingh was tensed too. Rejection from Sajjansingh not just meant a devastated life for his still young sister but an unwanted burden of four additional mouths on his not so great finances. He had to somehow bottle his brother in law. 

When he met Sajjansingh, it didn't take him too long to realise that he is fighting a lost war with him. Sajjansingh was adamant on his stance and this was a danger signal for Karatarsingh's. He had to mitigate this risk to his wallet and then he came up with that evil plan. He told Sajjansingh "You said that 'you can not take care of more than two girls' - so I promise that Mandeep will return with just two girls". The deal was stuck. The fate was locked. One of the girl - mostly a newborn -  had to die.

Mandeep was discharged from hospital the very next day. Kartarsingh wasted no time in telling her about the pact he had arrived at with Sajjansingh. She has to get rid of that ill fortuned baby and return to her home - to Sajjansingh's home. She couldn't believe what she heard. She never thought her loving elder brother will say this. She argued "Bhaiyya please don't do this to me. If singhji is not ready to accept me with our third daughter, be it. I will stay here with you and I promise that we won't be a trouble to you and bhabhi. I will work here in house, I will work in our farms. Please let us stay here" but it didn't help. Kartarsingh was brutal enough not to budge with those emotional appeals. "Enough of this melodrama Mandeep. You are leaving this house tomorrow.  Better to go to your husband's place on his terms or find a new shelter for you and your daughters".

A helpless mother of three daughters - what is she going to do without home and any income source? The decision was made. Instead of risking future of 2 of her daughters, it's better to jeopardise life of one.

On that unfortunate night, when both her daughters and Kartarsingh's family were fast asleep, she came out in the verandah in the nail biting cold of winter nights of Punjab. Temperature must have dropped to 2 degree celsius. She kept her week old baby on the cold floor of verandah - without any clothes, without any cover. She left her there to die.

She was determined not to come out untill next morning and then lift the dead girl with a loud scream.People will obviously gather with her scream and then she would tell them that she accidently left her baby in the open and forgot about it. A full throttle melodrama would follow.

THAT MORNING

 When Mandeep came out in the morning she couldn't believe her eyes. Her week old baby had turned blue entirely, she was gasping for breath - but... But she was alive. Neelangi (blue bodied (girl)) - was still alive.

That was the moment when Mandeep decided that if a week old infant can fight with death for entire night, she as a fully grown adult can sure fight the world for well being of her daughters. This was the turning point of her life.

- END - 



(This story was told by Ms. Smriti Irani in women empowerment seminar organised by Art of Living. Ms. Irani in her early days as an actor had interviewed - Mandeep (all names in the story including hers are unreal) now a known social worker. She had asked Ms. Irani to introduce herself as a murderer of her daughter) 

Ms. Iran's Speech:

Saturday, May 20, 2017

Not-so-common Names for Indian Boys and Girls

References: 1. Sanskrit-Marathi-English-Dictionary
                     2. Chaus Marathi Dictionary
                     3. Dyaneshwari Shabdakosh
                     4. https://www.pitarau.com

Boy
No
Name
Meaning
नाव
अर्थ
1
Kovid
Experienced
कोविद
अनुभवी
2
Kalya
Healthy
कल्य
निरोगी
3
Kubhrut
Mountain
कुभृत
पर्वत
4
Kairav
White Lotus
कैरव
पांढरे कमळ
5
Kushagra
Intelligent, Sharp / Keen / Quick-witted
कुशाग्र
बुद्धिमान
6
Kuruvinda
Ruby
कुरुविंद
माणिक
7
Koteer
Crown
कोटीर
मुकुट
8
Jaatved
Fire
जातवेद
अग्नि
9
Jishnu
Victorious
जिष्णु
जिंकणारा
10
Neerad
Cloud
नीरद
ढग
11
Nidhan
Treasure
निधान
साठा
12
Nivaha
Collection
निवह
साठा
13
Pranshu
High
प्रांशु
उंच
14
Poorit
Filled
पूरित
भरलेला
15
Prakarsha
Excellence
प्रकर्ष
मोठा गुण
16
Payodhi / Udadhi / Jaladhi
Ocean
पयोधि / जलधि / उदधि
समुद्र
17
Mardav
Softness, gentle
मार्दव
मऊपणा
18
Yuvan
Youth
युवन
तरुण
19
Rushit
Adorned
रुषित
अलंकारलेला
20
Rochis
Light
रोचिस
तेज
21
Ray
Current
रय
प्रवाह
22
Vyutpann
Learned
व्युत्पन्न
अतिशय विज्ञ्वान
23
Vahni
Fire
वह्नि
अग्नि
24
Virakta
Free from pation
विरक्त
अनासक्त
25
Vishuddha
Very Pure
विशुद्ध
अत्यंत शुद्ध
26
Vidit
Known
विदित
जाणलेले, माहीत असणारं / पूर्ण कळलेले
27
Vibodha
Wakening
विबोध
जागृती
28
Vijigeeshu
Desirous to conquer 
विजिगीषु 
जिंकू इच्छिणारा
29
Varenya
Eminent
वरेण्य
श्रेष्ठ
30
Sharva
Shankar
शर्व
शिव , शंकर
31
Shlaghya
Praiseworthy
श्लाघ्य
स्तुत्य
32
Sartha
Meaningful
सार्थ
अर्थपूर्ण
33
Soushthav
Excellence
सौष्ठव
उत्तमपणा
34
Sajusha
companion
सजुष
जोडीदार
35
Saayujya
Intimate union, Unity with god
सायुज्य
दृढ संयोग, ईश्वराशी ऐक्य, समाधीची शेवटची पायरी
36
Sur
God
सुर
देव
37
Sookta
Vedic hymn
सूक्त
वेदातील स्तोत्र
38
Shreshtha
Best
श्रेष्ठ

39
Dnyeya
knowable / Cognizable
ज्ञेय
जाणण्या योग्य/ज्ञान
40
Dnyaata
Knower
ज्ञाता
जाणणारा / ज्ञान असणारा
41
Geervaan
God / one who likes to be praised
गीर्वाण
देव /
42
Aadhey
worthy of giving shelter
आधेय
आधार घेण्यास योग्य
43
Aarav
park
आरव
बाग
44
Druma
Tree
दृम
झाड
45
Dhyeya
Subject of meditation
ध्येय
ध्यानाचा विषय
46
Prabuddha
The one who knows
प्रबुद्ध
जाणता
47
Praroha
Growth
प्ररोह
वाढ
48
Praseed
Bless me
प्रसीद
कृपा कर
49
Velhaal
Lovable
वेल्हाळ
प्रिय
50
Sadhar
Fixed
सधर
दृढ
51
Samargha
Easy to understand
समर्घ
कळण्यास सोपा
52
Souras
Sweet
सौरस
गोडी / प्रसाद / संबंध / अभिप्राय
53
Ankur
Bud
अंकुर

54
Adhvaryoo
Protagonist
अध्वर्यू
कैवारी
55
Eshta
Desirable / Desired
इष्ट

56
Upaasya
Venerable / an object of worship
उपास्य

57
Urdhva
Upper / High
ऊर्ध्व

58
Ojasvee
Bright / Brilliant / Resplendent
ओजस्वी

59
Kanav
Compassion
कणव

60
Kanak
Gold
कनक
सोनं
61
Khag
Bird
खग
पक्षी
62
Khachit
Studded
खचित

63
Chiraayoo
Long Lived
चिरायू

64
Teertha
a place of pilgrimage
तीर्थ

65
Dhureen
The Head / The chief / Leading
धुरीण

66
Nishnaat
Expert / Skilled
निष्णात

67
Nisseem
Boundless / immeasurable / limitless
निस्सीम
सीमा रहीत
68
Paris
a philosopher's stone
परिस
धातूचं सोनं करणारा दगड
69
Pareekshit
Examined / Tried / Proven
परीक्षित
अर्जूनाचा नातू
70
Pourush
virility / manhood / manliness
पौरुष

71
Prakarsha
Abundance
प्रकर्ष
भरपूर
72
Prateet
Experienced
प्रतीत
अनुभवी
73
Prathit
renowned / celebrated
प्रथित

74
Prerit
inspired / motivated
प्रेरित

75
Biruda
a mark of excellence
बिरुद

76
Bhadra
auspicious
भद्र

77
Moulik
valuable / fundamental / original
मौलिक

78
Ruchir
Lovely / Beautiful / Attractive / Charming
रुचिर

79
Vajra
a thunderbolt / lightning / steel
वज्र
विज
80
Vandit
adored
वंदित

81
Vandya
adorable
वंद्य

82
Vardhishnoo
increasing
वर्धिष्णू
वाढणारं
83
Vidur
a learned man
विदुर
शिकलेला पुरुष
84
Vishuddha
pure / clean
विशुद्ध
शुद्ध
85
Vedhak
attractive
वेधक
आकर्षक
86
Shraddheya
worthy of faith
श्रद्धेय
श्रद्धा ठेवण्यास योग्य
87
Shlaaghya
commendable
श्लाघ्य
स्तुत्य
88
Samyak
proper / correct / right, well
सम्यक
बरोबर / योग्य, छान
89
Saakalya
totality / entirety
साकल्य
सर्व
90
Saakha
reputation / credibility
साख

91
Saanunaya
humble / modest
सानुनय

92
Saalas
simple / gentle / good natured / modest
सालस
साधा
93
Sudnya
sensible / wise / sage
सुज्ञ
चांगलं ज्ञान असलेला
94
Stavan
praise
स्तवन
स्तुती
95
Stutya
praiseworthy
स्तुत्य
स्तुती करण्यास योग्य
96
Stotra
a hymn
स्तोत्र
श्लोक
97
Lobhas
Lust inducing
लोभस
मोहात टाकणारं
98
Laghav
Love
लाघव
प्रेम
99
Aadya
1st, Name used for Ganapati in Dyaneshwari
आद्य
पहीला, ज्ञानेश्वरीत गणपतीला वापरलेलं नाव
100
Abhidnya
Expert
अभिज्ञ
पारंगत, निष्णात
101
Abhva
Great, Powerful
अभ्व
महान, शक्तिवान
102
Amedh
Intelligence
अमेध
बुद्धी
103
Ayan
Solar path
अयन
सुर्याचा भ्रमणाचा मार्ग
104
Adheesh
King
अधीश
स्वामी , राजा
105
Asit
Shreekrushna
असित
श्रीकृष्ण, काळा
106
Adhit
King
अधित
राजा
107
Adhip
King
अधिप
स्वामी
108
Aarsh
Sacred
आर्ष
पवित्र
109
Ivan
Equal
इवान
समान, देवाचा आशिर्वाद
110
Urveesh
King of the earth
उर्वीश
पृथ्वीपती, राजा
111
Udapi
Sea
उदपि
समुद्र
112
Uttung
Very high
उत्तुंग
फार उंच
113
Kanaad
A well known sage
कणाद
एक ऋषी
114
Kavan
Hymn
कवन
पद्य रचना
115
Krunaal
Gentle
कृणाल
कोमल
116
Drusheek
Noticeable
दृशीक
लक्ष देण्यासारखा
117
Paavan
Vyaas, Pure, Vishnoo
पावन
व्यास , शुद्ध, विष्णू
118
Paarshad
Favourite
पार्षद
आवडता
119
Purvil
Direction
पुर्विल
दिशा
120
Pruthoo
Different, Clever
पृथू
भिन्न, वेगळा, चतुर
121
Pourav
King Porus
पौरव
पुरु राजा
122
Pravar
Main, Best
प्रवर
प्रमुख, उत्कृष्ट
123
Praanchoo
High, Vishnoo
प्रांशू
उंच, विष्णू
124
Shreesh
Vishnoo
श्रीश
लक्ष्मी पती
125
Arhat
Respectable / Worthy / able / One who has attained higher most level of spiritual knowledge as per Buddhist / Jain traditions
अर्हत

126
Bhrigu

भ्रिगु

127
Charak

चरक

128
Khadir
heavenly, celestial, moon, Indra, black cutch tree
खदिर

129
Aaroh
rising, increasing, pride and rider
आरोह

130
Archis
ray of light or lustre
अर्चिस

131
Vashishtha
most excellent, master of all creation, dearest, distinguished
वशिष्ठ

132
Preyas
Lovable, more agreeable, more desired, love and flattery
प्रेयस

133
Aalaap
kind of melody
आलाप

134
Arha
someone who is deserving or full of merit, worthy of being praised, Lord Vishnoo
अर्ह

135
Vyas
separation, diffuse, extension, arranger, division, severing and diameter
व्यास

136
Rbhu
artist, clever, deity
A sage who was the son of Brahma and a brilliant scholar (Vishnu Purana),
the god who is worshiped by other gods Another name for Agni, Indra and the Adityas.
ऋभु

137
Tavish
Courageous, Heaven, Strong, Gold
तविष

138
Vedhas
brave, wise or learned man, wealth, worshipper of the gods, name of Harishchandra's father
वेधस

139
Parasme
name of lord Rama, superior
परस्मै

140
Varchaswee
Energetic, Vigorous, Vital, One who has absolute power
वर्चस्वी
ज्याचं वर्चस्व आहे, शक्तीशाली, तेजस्वी
141
Siddha

सिद्ध

142
Gareeya
better
गरीय
बेहतर
Girl
No
Name
Meaning
नाव
अर्थ
1
Stutee

स्तुती

2
Agrima

अग्रिमा
पहीली
3
Atiga
Surpassing
अतिगा
वरचढ
4
Aakhya
Name
आख्या
नाव, किर्ती
5
Gaathaa
Religious Poetry
गाथा
धार्मिक काव्य
6
Gira
Voice
गिरा
वाणी
7
Ghrutachee
Night
घृताची
रात्र
8
Charvee
Beautiful Female
चार्वी
सुंदर स्त्री
9
Jigeeshaa
Desire of conquering
जिगीषा
जिंकण्याची इच्छा
10
Dhruti
Courage
धृति
धैर्य
11
Dhee
Intelligence
धी
बुद्धी
12
Dhishana
Praise
धिषणा
स्तुती
13
Yosha
Young women
योषा
तरुणी
14
Raka
Full Moon day
राका
पुर्णिमा
15
Vaikharee
Speech
वैखरी 
वाणी
16
Swasti
Well
स्वस्ति
ठीक
17
Struvati
River
स्त्रुवती
नदी
18
Saadhvee
Sacred woman
साध्वी
शुद्ध स्त्री
19
Shredhi
Progress
श्रेढी
प्रगती, चढता क्रम
20
Urvee
Earth
उर्वी
पृथ्वी
21
Kshoni
Abundance
क्षोणी
विपुलता
22
Garui
Great
गरुइ
श्रेष्ठ, मोठी
23
Gomatee
Beautiful
गोमटी
सुंदर
24
Druti
Fragrance
दृति
सुवास
25
Dhruti
Courage
धृति
धैर्य
26
Vajrangee

वज्रांगी
चिलखत / कवच
27
Aaveshi
One who has enveloped
आवेषि
व्यापून राहते
28
Shronavee
Earth
श्रोणवी
पृथ्वी
29
Suhava
Sweet Voice
सुहावा
गोड स्वर
30
Agranee
Leading
अग्रणी

31
Asmani
Azure
अस्मानी

32
Ojasvee
Bright / Brilliant / Resplendent
ओजस्वी

33
Garima
Dignity
गरिमा

34
Jaladhee
Sea
जलधी
पाण्याचा साठा
35
Takaakee
Gloss / Polish / Shine
तकाकी

36
Tushtee
Gratification
तुष्टी

37
Dyutee
Light
द्युती
प्रकाश
38
Pratishthaa
Prestige / Reputation
प्रतिष्ठा

39
Vidushee
a learned woman
विदुषी
शिकलेली स्त्री
40
Shlaaghaa
praise / flattery
श्लाघा
स्तुती
41
Sweeyaa
personal
स्वीया
खाजगी
42
Arvitaa
Speed, velocity
अर्विता
वेग, गती
43
Aadimaa
First
आदिमा
पहीली
44
Aadyaa
Of the beginning
आद्या
प्रारंभीची
45
Aarshaa
Sacred
आर्षा
पवित्र
46
Eevishaa
First Female
ईविशा
आद्य स्त्री
47
Oorvee
Earth
ऊर्वी
पृथ्वी
48
Krushneemaa
Black
कृष्णीमा
कृष्ण वर्णी
49
Kairavee
White lotus
कैरवी
पांढरे कमळ
50
Tripaa
Parvatee
त्रिपा
पार्वती
51
Tanveshaa
Delicate
तन्वेशा
नाजूक
52
Tarishee
Indra's daughter
तरिषी
इंद्र कन्या
53
Tavishee
God's daughter
तविषी
देव कन्या
54
Diggajaa
Learned
दिग्गजा
विद्वान
55
Nishthaa
Love, devotion
निष्ठा
भक्ती, प्रेम
56
Pahoomee
Earth
पहूमी
पृथ्वी
57
Pouravee
Vasudev's wife
पौरवी
वसुदेवाची एक पत्नी
58
Praagee
Prosperous
प्रागी
प्रगती कारक
59
Prekhsaa
Knowledge
प्रेक्षा
ज्ञान / प्रज्ञा
60
Yoshitaa
Beautiful lady
योषिता
सुंदर स्त्री
61
Laaghavee
Fast?
लाघवी
स्फुर्ती / जलद ?
62
Viditaa
Knowledge
विदिता
ज्ञान
63
Varidhi
Ocean
वारिधि

64
Vagmee
Wordy, Eloquent, talkative and Speaking, Goddess Who Controls Word
वाग्मी

65
Vedhinee
knowing, feeling, proclaiming, Goddess Laxmi
वेधिनी

66
Vruddhi
growth
वृद्धि